येवल्यात शेतकरीप्रश्नी रिपाइंचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:26 AM2021-02-18T04:26:45+5:302021-02-18T04:26:45+5:30
थकीत वीजबिलापोटी महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात ...
थकीत वीजबिलापोटी महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात असताना शेतकरी अडचणीत सापडत आहेत. त्यामुळे शेतकर्यांची वीजतोडणी थांबवून, सक्तीने वसुली करण्यात येऊ नये, कोरोनाच्या काळात नागरिकांचे अतोनात हाल झाले असून, अद्यापही सर्वसामान्यांना रोजगार नसल्याने केशरी प्रवर्गातील गरीब, कष्टकरी शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला अल्पदरातील तांदूळ व गहू रेशनदुकानांमार्फत देण्यात यावा, इंधन, गॅसदरवाढ कमी करावी आदी मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर रिपाइं तालुकाध्यक्ष गुड्डू जावळे, उपतालुकाध्यक्ष बंडू शिंदे, युवा तालुकाध्यक्ष सुभाष पानपाटील, कार्याध्यक्ष मंगेश शिंदे, सखाराम सदगीर, कैलास साळुंके, भास्कर गायकवाड, म्हसू घोडेराव, मेहताब शेख, विकास घोडेराव आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
फोटो- १७ येवला आरपीआय
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे वतीने तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देताना पदाधिकारी.