शिंपी समाज युवा समितीचे पालकमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:25+5:302021-06-16T04:18:25+5:30
पालकमंत्री भुजबळ यांना यावेळी समितीच्यावतीने लेखी निवेदनही देण्यात आले. शासनाने २०२१ मध्ये राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिन ...
पालकमंत्री भुजबळ यांना यावेळी समितीच्यावतीने लेखी निवेदनही देण्यात आले. शासनाने २०२१ मध्ये राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक १४ जानेवारी, २०२१ रोजी काढले. मात्र या परिपत्रकात संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे ७५१ वे जयंती वर्ष व विश्वसंत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७२५ वे समाधी वर्ष असून देखील संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही, असे सदर निवेदनात म्हटले आहे.
संत शिरोमणी नामदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचा उल्लेख करून, सुधारित शासन परिपत्रक निर्गमित करण्यात यावे, अशी मागणीही सदर निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीचे अध्यक्ष मुकेश लचके, उपाध्यक्ष राम तुपसाखरे, सहचिटणीस पुरुषोत्तम रहाणे, संघटक अमोल लचके, कार्यवाहक राजेंद्र कल्याणकर, उपकार्यवाहक सोमनाथ शिंदे, चिटणीस पांडुरंग खंदारे, खजिनदार कवित माळवे, सहसंघटक तुषार भांबारे, पंकज शिंदे आदींसह समाजबांधवांच्या स्वाक्षर्या आहेत.