सिन्नर तालुका कॉंग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:13 AM2020-12-06T04:13:54+5:302020-12-06T04:13:54+5:30
केंद्र सरकारने कोणत्याही विरोधी पक्षाला विश्वासात न घेता, चर्चा न करता लोकशाहीचे उल्लंघन करत तीन शेतकरी विरोधी कायदे संसदेत ...
केंद्र सरकारने कोणत्याही विरोधी पक्षाला विश्वासात न घेता, चर्चा न करता लोकशाहीचे उल्लंघन करत तीन शेतकरी विरोधी कायदे संसदेत बळजबरीने मंजूर केले आहे, ते कायदे शेतकऱ्यांना मान्य नसून त्याविरोधात दिल्ली येथे लाखो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी विरोधातील तीन कायदे केंद्र सरकार रद्द करत नाही तोपर्यंत सिन्नर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलनास पाठिंबा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आंदोलनात ७० ते ८० वयोगटातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे. हे आंदोलन थांबविण्यासाठी केंद्र सरकार बळाचा वापर करून शेतकरी बांधवांवर पाण्याचे फवारे सोडत आहे. लाठीजार्च करत आहे. अनेक शेतकऱ्यांचे डोळे, हातपाय निकामी झाले असून, या हुकूमशाही कृत्याचा आम्ही निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मीना देशमुख, शहराध्यक्ष रत्नमाला मोकळ, तालुका समन्वय उदय जाधव, रावसाहेब थोरात, हेमंत क्षीरसागर, ज्ञानेश्वर पवार, त्र्यंबक सोनवणे, अश्फाक शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : ०५ सिन्नर काँग्रेस
सिन्नर येथे तालुका कॉंग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार दत्ता जाधव यांना निवेदन देताना कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे. समवेत पदाधिकारी, कार्यकर्ते.
===Photopath===
051220\05nsk_16_05122020_13.jpg
===Caption===
सिन्नर येथे तालुका कॉँग्रेसच्यावतीने नायब तहसीलदार दत्ता जाधव यांना निवेदन देताना कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे. समवेत पदाधिकारी, कार्यकर्ते.