शिक्षक परिषदेचे दिंडोरी तहसीलदारांना आधार कार्डबाबत निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:14 AM2021-03-05T04:14:36+5:302021-03-05T04:14:36+5:30
:-तालुक्यातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शिबिर केंद्रस्तरावर घेण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब बहिरु जाधव यांचे ...
:-तालुक्यातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शिबिर केंद्रस्तरावर घेण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब बहिरु जाधव यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिंडोरी तहसीलदार पंकज पवार यांना दिले. या विषयांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झाली आहे. सरल प्रणालीत तीच विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. आधार कार्ड नोंदणीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांना गैरसोयीचे होते. आधार कार्ड नोंदणीची गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थी हिताच्या दृष्टीने आधारकार्ड नोंदणी शिबिर केंद्रवाईज घेण्यात यावे म्हणजे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी कार्याध्यक्ष सुभाष बर्डे,सहकार्यवाह नितीन शिंदे,उपाध्यक्ष सुरेश भोये, तालुका प्रतिनिधी दादा इथापे आदी उपस्थित होते. (०४ दिंडोरी १)
===Photopath===
040321\04nsk_4_04032021_13.jpg
===Caption===
०४ दिंडोरी १