भाकप, किसान सभेतर्फे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:59 PM2020-07-23T21:59:15+5:302020-07-24T00:26:02+5:30

चांदवड : दूधपावडर आयात रद्द करून दुधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव द्यावा, अशी मागणी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने अ‍ॅड. दत्तात्रय गांगुर्डे, भास्करराव शिंदे, किरण डावखर, इसामिया शेख, अ‍ॅड.गणेश ठाकरे, सचिन वाळुंज, अकिब शेख, सुकदेव केदारे, दशरथ कोतवाल, एस. के. ठाकरे, युवराज हिरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Statement to Tehsildar on behalf of CPI, Kisan Sabha | भाकप, किसान सभेतर्फे तहसीलदारांना निवेदन

भाकप, किसान सभेतर्फे तहसीलदारांना निवेदन

googlenewsNext

चांदवड : दूधपावडर आयात रद्द करून दुधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव द्यावा, अशी मागणी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने अ‍ॅड. दत्तात्रय गांगुर्डे, भास्करराव शिंदे, किरण डावखर, इसामिया शेख, अ‍ॅड.गणेश ठाकरे, सचिन वाळुंज, अकिब शेख, सुकदेव केदारे, दशरथ कोतवाल, एस. के. ठाकरे, युवराज हिरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्टÑातील दूध उत्पादक शेतकरी लॉकडाऊनमुळे दूध उत्पादन होऊनही हॉटेल व विवाह समारंभ बंद असल्याने अडचणीत सापडला आहे. दुग्धजन्य जनावरांचे संगोपन करण्यासाठी चारा, खुराक, खाद्य यांच्या किमती वाढल्या आहेत. सध्या दुधाला प्रतिलिटर अवघे १६ ते १७ रुपयांपेक्षा कमी भाव आहे. त्यामुळे दूध उत्पादक अडचणी सापडला आहे.
केंद्र सरकारने दूधपावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, तीस हजार टन बफर दूध स्टॉक करा, तसेच प्रतिकिलो अनुदान ३० रुपये द्या, दूधपावडर, बटर, तूप, इतर पदार्थांवरील जीएसटी रद्द करावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Web Title: Statement to Tehsildar on behalf of CPI, Kisan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक