किसान सभेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 09:29 PM2020-07-17T21:29:46+5:302020-07-18T00:41:39+5:30
चांदवड : कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे, वीजबिल माफ करावे व इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष अॅड. दत्तात्रय गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे, सुकदेव केदारे, किरण डावखर, नानासाहेब मोरे, लहानु ठाकरे, छबू पूरकर, लक्ष्मण आहेर, दशरथ कोतवाल, अशोक मोरे, एकनाथ मोरे यांचा समावेश होता.

उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे, वीज वितरण कंपनीने दिलेले संपूर्ण बिल माफ करावे, कोरोनाकाळात शेती व शेतकरीविरोधात काढलेले सर्व आदेश मागे घ्यावेत, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांचे पीक कर्ज, खते त्वरित उपलब्ध करून देण्यात यावेत, आयकर न भरणाºया कुटुंबांना दरमहा ७५०० रुपये कोविडसाठी प्रत्येक कुटुंबाला देण्यात यावे, प्रत्येक कुटुंबाला प्रतिव्यक्ती दहा किलो धान्य द्यावे, डिझेल, पेट्रोलची दरवाढ मागे घ्यावी, ६० वर्षांवरील शेतकरी, शेतमजूर, कारागीर यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्या, आरोग्य कायद्याची केरळच्या पद्धतीने अंमलबजावणी करा, १४ वर्षांखालील मुलांना सर्व माध्यमाचे मोफत शिक्षण द्यावेत आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
चांदवड तालुक्यातील पाटे येथील शेतकरी भाऊसाहेब अमृता ठाकरे यांनी चांदवड तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे. पाटे व्हाया काजीसांगवी चांदवड रस्ते विकास मंडळ यांनी तयार केलेल्या नकाशा २००१ ते २१ प्रमाणे पाटे काजीसांगवी चौफुली ते बसथांबा या सरळ रेषेत व नकाशा प्रमाणे व्हावा, शोभा शहाजी सोनवणे यांची जागा
१८ बाय ९ असताना १५ बाय ४० बांधकाम सुरू झाले तेव्हा फोनद्वारे व लेखी अर्ज करूनसुद्धा ग्रामपंचायतीने अतिक्रमण बांधकाम बंद केले नाही, सर्व कामात कर्तव्यात कसूर केल्यामुळे ग्रामसेवक सरपंच यांना बडतर्फे करावे, वडिलोपार्जित कब्जे वहीवाटीतील १५० वर्षांपूर्वीची जागेवर केलेले बांधकाम कायम करावे व त्याचा मी कर भरलेला आहे या मागण्यासाठी सदरचे उपोषण सुरू आहे.