शिक्षक समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:14 PM2020-07-27T22:14:28+5:302020-07-28T00:32:58+5:30
मेशी : नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी यांना पेन्शन योजना लागू नाही. शासनाच्या या धोरणाविरोधात कर्मचााऱ्यांनी अनेकवेळा आंदोलन केली; परंतु प्रत्येकवेळी शासनाने वेळकाढू धोरण अवलंबले. यामुळे शिक्षक संघर्ष समितीच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांना निवेदन देण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळून देवळा तालुक्यातील पेशन्स योजनेपासून वंचित असलेल्या सदस्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन चर्चा केली. याप्रसंगी व्ही. एम. सावंत, सुनील शिंदे, ए. के. सावंत, विवेक सागर, बी. पी. देवरे, पुष्पा सोनवणे आदी उपस्थित होते.
दरम्यान, कोरोना काळात अनेक शिक्षकांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या चेक पोस्टवर तसेच घरोघरी सुरू असलेल्या सर्वेक्षण मोहिमेत सहभाग घेतले. त्यात अनेकांना कोरोनाची बाधा झाली. तर काहींना प्राण गमवावे लागल्याने शासनाने तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.