आरोग्य कर्मचारी मारहाण प्रकरणी तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:17 AM2021-09-22T04:17:21+5:302021-09-22T04:17:21+5:30

पेठ : सिन्नर तालुक्यात कोविड-१९ लसिकरणात आरोग्यसेवकांना केलेल्या मारहाणीत तेथील समाजकंटकाविरुद्ध कारवाई करावी या मागणीसाठी आरोग्य संघटनेमार्फत पेठचे ...

Statement to Tehsildar in case of beating of health workers | आरोग्य कर्मचारी मारहाण प्रकरणी तहसीलदारांना निवेदन

आरोग्य कर्मचारी मारहाण प्रकरणी तहसीलदारांना निवेदन

Next

पेठ : सिन्नर तालुक्यात कोविड-१९ लसिकरणात आरोग्यसेवकांना केलेल्या मारहाणीत तेथील समाजकंटकाविरुद्ध कारवाई करावी या मागणीसाठी आरोग्य संघटनेमार्फत पेठचे तहसीलदार संदीप भोसले यांना आरोग्य तालुका अधिकारी डाॅ. योगेश मोरे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली आरोग्य केंद्रांतर्गत पास्ते गावात कोविड लसीकरणादरम्यान आरोग्यसेवक व आरोग्यसेविका यांना समाजकंटकाकडून मारहाण झाली होती. याच्या निषेधार्थ पेठ तालुक्यात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला.

ग्रामीण भागात शासकीय कामकाज करताना अनेक समाजकंटकांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास होत असून, आवश्यक उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी किसन खातळे यांना पेठ आरोग्य कर्मचारी संघटनेकडून निवेदन देण्यात आले.

यावेळी डाॅ. योगेश मोरे, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप वाघेरे, राज्य आरोग्य कर्मचारी (हिवताप) महासंघाचे तालुकाध्यक्ष किसन ठाकरे, राजेंद्र गवळी, राजेंद्र तवर, संदीप पवार, दिनकर ठाकरे, सुरेश जाधव, गिरीश देशमुख, विलास जाधव, दीपक सूर्यवंशी, योगिराज गांगोडे, भास्कर गवळी, देवीदास चव्हाण, बागुल व संघटनेचे पदाधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

(२१ पेठ निवेदन)

पेठ तालुका आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन देताना डॉ. योगेश मोरे, संदीप वाघेरे, किसन ठाकरे, राजेंद्र गवळी आदी.

210921\21nsk_36_21092021_13.jpg

पेठ तालुका आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले यांना निवेदन देतांना डॉ. योगेश मोरे, संदिप वाघेरे, किसन ठाकरे, राजेंद्र गवळी आदी.

Web Title: Statement to Tehsildar in case of beating of health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.