चांदवडला पीककर्जप्रश्नी तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 09:35 PM2020-07-22T21:35:29+5:302020-07-23T00:58:59+5:30
चांदवड : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज व दूध उत्पादकांना अनुदान द्यावे या मागणीचे निवेदन तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले.
चांदवड : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज व दूध उत्पादकांना अनुदान द्यावे या मागणीचे निवेदन तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले.
यावेळी तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल प्रथम, माजी अध्यक्ष सुनील शेलार, मुकेश आहेर, महेश खंदारे, काशीफ खान, बाळा पाडवी, नितीन फंगाळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना पीककर्ज व दूध उत्पादकांना अनुदान मिळावे तर महाराष्ट्रात शेतकरीवर्गाची अवस्था अतिशय बिकट असून, ज्या शेतकºयांनी आपल्या पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड केलेली आहे, अशा शेतकºयांना विविध विकास सोसायट्यांमार्फत पीककर्ज मिळणार नाही, असे सांगण्यात येत आहे.
पीकवाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर शेतकºयांना युरियाची टंचाई जाणवत आहे. त्वरित तालुक्यात युरिया मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.