शेतकरी मारहाणप्रकरणी तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:11 AM2021-07-02T04:11:04+5:302021-07-02T04:11:04+5:30
परभणी जिल्ह्यातील दैठणा येथील पोलीस ठाण्यातील कर्मचारी बळीराम मुंडे यांनी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख माधव शिंदे ...
परभणी जिल्ह्यातील दैठणा येथील पोलीस ठाण्यातील कर्मचारी बळीराम मुंडे यांनी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख माधव शिंदे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ निफाड येथे नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाधक्ष अर्जुन बोराडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करून त्यास निलंबित करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी शंकर पुरकर, रामकृष्ण बोंबले, संतू बोराडे, श्रद्धा भालेराव, प्रीती बोंबले, अकील हसन आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - ३० कसबे १
निफाड येथे शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देताना अर्जुन बोराडेल, शंकर पूरकर, रामकृष्ण बोंबले, संतू बोराडे व श्रद्धा भालेराव आदी.