येवला तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन
By Admin | Published: June 6, 2017 02:54 AM2017-06-06T02:54:42+5:302017-06-06T02:54:52+5:30
येवला : आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी येवल्यातील किसान क्रांती मोर्चा आंदोलनाच्या शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : तालुक्यातील येवला- कोपरगाव रोडवरील पिंपळगाव जलाल टोलनाक्यावरील झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी येवल्यातील किसान क्रांती मोर्चा आंदोलनाच्या शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार नरेश बहिरम व येवला शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी किसान क्र ांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करून शासनचा निषेध केला.
पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर झालेल्या आंदोलनात परिसरातील उंदीरवाडी, आडगाव चोथवा, पिंपळगाव जलाल या गावातील शेतकर्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. परंतु हा शेतकरी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करत होते. शेतकऱ्यांनी या संपात भाग घेऊन नये अशी दहशत बसविण्यासाठी पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. सनदशीर मार्गाने सुरु असलेल्या या आंदोलनाला गालबोट लागू नये अशी काळजी प्रशासनानेदेखील घेतली पाहिजे. शेतकर्यावर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेऊन त्यांची सुटका करण्याची मागणी किसान क्र ांती मोर्चाच्या शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.
निवेदनावर राष्ट्रवादीचे अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, शिवसेना नेते संभाजीराजे पवार, पं. स. सभापती संजय बनकर, मंगेश भगत, विठ्ठल आठशेरे, रूपचंद भागवत, बापू गायकवाड, वसंतराव पवार, बाळासाहेब लोखंडे, प्रकाश वाघ, कांतीलाल साळवे, भागवत सोनवणे, नवनाथ काळे, कृष्णराव गुंड, प्रकाश वाघ, अर्जुन कोकाटे, अरु ण जाधव, अमोल फरताळे, दत्तू खिल्लारे, ज्ञानेश्वर दराडे, शिवाजी भालेराव, किरण ठाकरे, साईनाथ खोकले, नानासाहेब लभडे, सुदाम लभडे, विक्र म पवार, महेंद्र पगारे, भाऊसाहेब गरुड, देवीदास शेळके, अशोक मेंगाणे आदींसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.