स्थानकात चालक-वाहकांचे माती लावून ‘अभ्यंगस्नान’; सरकारच्या आडमुठ्या धोरणाचा ‘एसटी’ला ब्रेक;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 04:36 PM2017-10-19T16:36:01+5:302017-10-19T16:42:51+5:30
सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मोठा प्रभाव महामंडळाच्या नाशिक विभागावर पडला. मंगळवारी (दि.१७) मध्यरात्रीपासून सुरू झालेला चालक-वाहकांचा संप आज तीसर्या दिवशीही ‘जैसे-थे’ असल्याने सणासुदीच्या काळात चालक-वाहकांसह प्रवाशांची गैरसोय सुरूच आहे.
नाशिक : एक नव्हे तर सलग तीन दिवसांपासून राज्यातील ‘लाल परी’ रुसली आहे; यामुळे ऐन दिपोत्सवाच्या हंगामात उंबर्यावर पाहुण्यांचे आगमन कसे होणार अशीच काहीसी चिंता महाराष्ट्र नवे तर ‘संपराष्ट्र’ झालेल्या नागरिकांना सतावत आहे. महामंडळाच्या नाशिक विभागातून सहा हजार कर्मचारी संपात उतरल्याने ‘एसटी’ रस्त्यावर तीन दिवसांपासून उतरू शकली नाही. यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहे. एका दिवसावर भाऊबीज येऊन ठेपली असताना अद्यापही ‘एस.टी’चा संप मिटता मिटत नसल्यामुळे बहिणींची भावाच्या घरी येताना दमछाक होते की काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते व राज्य सरकारच्या निषेधार्थ नाशिकमधील नवीन मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात चालक-वाहकांनी अंगाला माती लावून ‘अभ्यंगस्नान’ केल्याचे बोलले जात आहे.
सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मोठा प्रभाव महामंडळाच्या नाशिक विभागावर पडला. मंगळवारी (दि.१७) मध्यरात्रीपासून सुरू झालेला चालक-वाहकांचा संप आज तीसर्या दिवशीही ‘जैसे-थे’ असल्याने सणासुदीच्या काळात चालक-वाहकांसह प्रवाशांची गैरसोय सुरूच आहे.
जोपर्यंत सातवा वेतन आयोग लागू होत नाही आणि किमान वेतन कायद्यानुसार वेतन पदरात पडत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी घेतली आहे. त्याचप्रमाणे सरकारने देखील राज्य कर्मचाºयांप्रमाणे एसटीच्या कामगारांना सातवा वेतन आयोग देता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे. एकूण दोघांच्या आडमुठेपणामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात असून , ‘यात आमचा दोष काय...? असा सवाल उपस्थित केला जात आहे.