एकलहरे प्रकल्पग्रस्तांचे दाखल्यांसाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:02 AM2019-08-22T00:02:04+5:302019-08-22T00:02:38+5:30

एकलहरे औष्णिक वीज केंद्रासाठी जमिनी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले त्वरित मिळावेत, अशी मागणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.

 Stats for proof of solo project sufferers | एकलहरे प्रकल्पग्रस्तांचे दाखल्यांसाठी साकडे

एकलहरे प्रकल्पग्रस्तांचे दाखल्यांसाठी साकडे

Next

एकलहरे : एकलहरे औष्णिक वीज केंद्रासाठी जमिनी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले त्वरित मिळावेत, अशी मागणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.
मुंबईला गेलेल्या शिष्टमंडळाने यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक तालुक्यातील एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पासाठी एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, देवळाली, ओढा, शिलापूर, पंचक या गावांतील १३०० हेक्टर जमिनी संपादित झालेल्या आहेत. मात्र प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित करण्यास १९९३ साली पुनर्वसन कायदा लागू करून प्रकल्पग्रस्त दाखले देण्यात आले. एकलहरे प्रकल्पात ज्या गावांच्या जमिनी गेल्या तेथील बरेचसे शेतकरी भूमिहीन झाले.
ज्या शेतकºयांच्या जमिनी गेल्या त्यांना अवॉर्डनुसार जमिनीचे अत्यल्प पेमेंट मिळाले आहे. अशा सर्व शेतकºयांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देण्यासाठी जिल्हाधिकारी नाशिक यांना आदेश देण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नाशिक साखर कारखान्याचे माजी चेअरमन तानाजी गायधनी व कोटमगावचे माजी सरपंच दिनेश म्हस्के यांच्या सह्या आहेत.
जाचक अटी
महाराष्ट्र शासनाच्या जाचक अटींमुळे आतापर्यंत फक्त २०० शेतकºयांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले मिळाले आहेत. अद्याप १२०० शेतकरी दाखल्यांपासून वंचित आहेत. पुनर्वसन अधिनियमानुसार ज्या शेतकºयांच्या जमिनी प्रकल्पात बाधित झाल्या त्यांच्या सर्व वारसांना प्रकल्प बाधित म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Web Title:  Stats for proof of solo project sufferers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक