रासाका सुरू करण्यासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 16:20 IST2019-11-21T16:20:27+5:302019-11-21T16:20:43+5:30
शिष्टमंडळाची भेट : साखर सहसंचालकांशी चर्चा

रासाका सुरू करण्यासाठी साकडे
सायखेडा : निफाड तालुक्यातील क.का. वाघ सहकारी साखर कारखाना (रानवड) सुरू करण्याची निविदा तत्काळ प्रसिद्ध करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने साखर विभागाचे सहसंचालक बाजीराव शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली.
अहमदनगर येथे सहसंचालक शिंदे यांबरोबर झालेल्या चर्चेप्रसंगी तालुक्यातील ऊसउत्पादक, शेतकरी, कामगार नेते, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन वर्षांपासून कारखाना बंद असल्याने तो सुव्यवस्थित केल्यास चालू वर्षाचा गळीत हंगाम मिळेल तसेच करखान्यावरील ओव्हरहेड्स वाढत असल्याने बोजा वाढत असून कारखाना दिवसागणिक कर्जाच्या खाईत जात आहे. त्यामुळे तातडीने भाडेतत्वाची निविदा तत्काळ प्रसिद्ध करून शेतकरी, कामगार यांची होणारी परवड थांबवावी तसेच तालुक्यातील साखर कारखाने बंद असल्याने इतर कारखान्यांना ऊस जात असून शेतकऱ्यांचे पैसे बुडविले जात असल्याचेही चर्चेवेळी निदर्शनास आणून देण्यात आले. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ बोराडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल,नाना बच्छाव,चंद्रकांत बच्छाव,बळवंतराव जाधव,शिवराम रसाळ,सुभाष गायकवाड,अरु ण कुशारे,अरु ण कुयटे, बाळासाहेब ताकटे यांनी चर्चेत सहभाग घेतला. दरम्यान, बाजीराव शिंदे यांनी रासाकाची चाके नक्कीच फिरतील असा विश्वास शिष्टमंडळास दिला.