संतसेना महाराजांचे प्रतिमापूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:15 AM2018-09-08T01:15:50+5:302018-09-08T01:15:55+5:30

श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाशिक शहर नाभिक समाज युवक मंडळातर्फे शुक्र वारी (दि. ७) श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Statue of Saints Saints | संतसेना महाराजांचे प्रतिमापूजन

संतसेना महाराजांचे प्रतिमापूजन

Next

श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजनासाठी जनस्थान सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय साने व नाभिक युवक मंडळाचे संस्थापक दिलीप जाधव व नरेंद्र पवार.
नाशिक : श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाशिक शहर नाभिक समाज युवक मंडळातर्फे शुक्र वारी (दि. ७) श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
श्री सिद्धिविनायक (चांदीचा गणपती) मंदिराजवळ, रविवार कारंजा येथे संतसेना महाराजांचे दर्शन घेण्यासाठी समाजाचे नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रारंभी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जनस्थान सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय साने व नाभिक युवक मंडळाचे संस्थापक दिलीप जाधव व नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी नाभिक महामंडळाच्या नाशिक तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केदारनाथ गायकवाड यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष बिडवई, बबन बोरसे, अनंत सोनवणे, संतोष वाघ, श्यामराव निकम, अविनाश लोखंडे, अरुण सैंदाणे, अशोक सोनवणे, प्रदीप जाधव, दिनकर गायकवाड, धनवंती वाघ, सुनंदा अहेर उपस्थित होते.
संतसेना महाराजांची पालखी
संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त रामकुंडावरील गंगा गोदावरी वतनदार नाभिक संस्थेच्या संतसेना महाराज मंदिरात श्रींच्या मूर्तीस विधिवत अभिषेक करून महाआरती करण्यात आली. यावेळी नाभिक समाजाच्या वतीने वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. पंचवटीतील वैभव गार्डन मंगल कार्यालयात सायंकाळी गुणवंत गौरव सोहळा पार पडला. नाशिकरोड, सिडको, सातपूर भागात संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले होते. यावेळी सुभाष बिडवई, रमेश आहेर, अशोक सूर्यवंशी, संतोष वाघ, श्याम निकम, संजय गायकवाड, संतोष सोनवणे आदी उपस्थित होते.

Web Title: Statue of Saints Saints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.