घरात रहा सुरक्षित राहा, घराबाहेर पडू नका आमदारांची सर्वाना विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 04:27 PM2020-04-10T16:27:54+5:302020-04-10T16:31:33+5:30

कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन यंत्रणा कार्यरत आहेत का ? औषधे व सुरक्षा साधने याची माहिती घेऊन सामाजिक अंतर ठेवून तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या भेटी घेऊन घरात राहा, सुरक्षित रहा, घराबाहेर पडू नका अशी विनंती आमदार नितीन पवार यांनी नागरिकांना करु न लॉकडाऊन काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Stay home Stay safe, do not leave the house All MLA request | घरात रहा सुरक्षित राहा, घराबाहेर पडू नका आमदारांची सर्वाना विनंती

चणकापूर येथे नागरिकांशी संवाद साधताना आमदार नितीन पवार, ज्ञानदेव पवार निंबा पाटील, डी. एम. गायकवाड आदी.

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवून नितीन पवार यांचा मतदारसंघात दौरा

कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन यंत्रणा कार्यरत आहेत का ? औषधे व सुरक्षा साधने याची माहिती घेऊन सामाजिक अंतर ठेवून तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या भेटी घेऊन घरात राहा, सुरक्षित रहा, घराबाहेर पडू नका अशी विनंती आमदार नितीन पवार यांनी नागरिकांना करु न लॉकडाऊन काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कळवण तालुक्यातील अभोणा, नांदूरी, तिºहळ, देसगाव, वडाळे, दळवट, जिरवाडे, जयदर आदी भागात दौरा करून परिसरातील आरोग्यसेवेची माहिती घेतली. सामाजिक अंतर ठेवून गावोगावी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना घरातच रहा,सुरक्षित रहा, विनाकारण घराच्या बाहेर पडु नका, अत्यावश्यक कामासाठी बाहेर गेलातच तर आपले हात साबणाने स्वच्छ धुवा,मास्क वर सॅनिटायझरचा वापर करा, शेतकऱ्यांनी सुध्दा शेतात काही काम करीत असतांना पूरेसे अंतर ठेऊन कामे करा असे आवाहन केले.
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळते का, नाही? याची माहिती घेऊन ज्याच्यांकडे शिधा पत्रिका आहे परंतु ते दुकानातून धान्य घेत नाही त्यांनी व ज्याच्यांकडे शिधा पत्रिका नाही, अशा गरजूंना धान्य द्यावे असे आवाहन आमदारांनी यावेळी नागरिकाशी बोलतांना केले. गावात कोणी बाहेरची व्यक्ती कोणाकडे आल्यास तात्काळ प्रशासनास कळवून त्यांची आरोग्य तपासणी करून घ्या अशा सुचना दिल्या. लॉकडाऊन काळात कार्यकर्त्यांनी व सामाजिक संस्थांनी सर्वसामान्य, गरजू, शेतमजूरांना आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ज्ञानदेव पवार, मधुकर जाधव, सोमनाथ सोनवणे, डी. एम गायकवाड, रमेश पवार, राजु पाटील, भिवराज बागुल, सुभाष राऊत, सुधाकर सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Stay home Stay safe, do not leave the house All MLA request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.