कांदा पिकाच्या संरक्षणासाठी शेतातच मुक्काम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 02:15 PM2020-01-18T14:15:36+5:302020-01-18T14:15:49+5:30
पाटोदा : सध्या कांदा पिकास इतर शेती पिकांच्या मानाने चांगला बाजार भाव मिळत असल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा चोरी करण्याकडे वळविला असल्याने येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
पाटोदा : सध्या कांदा पिकासह इतर शेती पिकांच्या मानाने चांगला बाजार भाव मिळत असल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा चोरी करण्याकडे वळविला असल्याने येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला असून मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कांदा चोरी होऊनही पुढे आणखी त्रास नको म्हणून कांदा चोरी करणारे चोर माहिती असूनही शेतकरी भीतीपोटी तक्र ार करण्यास धजावत नसल्याने कांदा चोरट्यांचे फावले आहे.त्यामुळे कांद्याचे चोरांपासून संरक्षण व्हावे यासाठी जागता पाहारा देत शेतकरी वर्गाने शेतात कांदा राखण्यासाठी मुक्काम ठोकल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजारभावात कमालीची चढ उतार सुरु असल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्रीसाठीची लगबग सुरु असल्याने कांदा काढणीच्या कामांना वेग आलेला आहे.मात्र मजूर मिळत नसल्याने प्रत्येक शेतकरी दिवस रात्र एक करून कांदा विक्र ीसाठी तयार करीत आहे.मात्र सध्या कांदा चोरीच्या घटना वाढल्यामुळे शेतकर्यांनी चोरट्यांची धास्ती घेतली आहे.त्यामुळे शेतकर्यांना शेतात मुक्काम करून रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे.
.....................................................
कांदा चोरी बरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीपयोगी साहित्यांचीही चोरी होत आहे. विद्युतपंप, स्टार्टर, केबल,पाईप ,औषध फवारणी पंप आदि वस्तू चोरीला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कांदा व शेतीचे साहित्य चोरी होऊनही केवळ पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे नको म्हणून शेतकरी वर्ग पोलिसात तक्र ार करीत नाही तर काही शेतकरी धास्तीपोटी चोरांपासून पुढील काळात शेती पिकांना हानी होऊ नये म्हणून पोलिसात तक्र ार व इतर ठिकाणी वाच्यता करीत नसल्याने चोरांचे चांगलेच फावले आहे.