चेंबरमधून चोरून शेतीसाठी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:59 AM2018-06-06T01:59:00+5:302018-06-06T01:59:00+5:30

नाशिक : महापालिकेने शहरात राबविलेल्या भुयारी गटार योजनेचे चेंबरमधील मलजल अडवून त्याचा शेतीसाठी पाणी वापरण्याचा प्रकार वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ उघड झाला आहे. अशाप्रकारे आढळलेला हा तिसरा प्रकार असून, चेंबरमध्ये अडथळे आणल्याने गटारी तुंबण्याचे प्रकार या चोऱ्यांमुळे उघड होत आहे.

Steal water from the chamber and steal water | चेंबरमधून चोरून शेतीसाठी पाणी

चेंबरमधून चोरून शेतीसाठी पाणी

Next
ठळक मुद्देवाघ कॉलेजजवळील प्रकार : लोखंडी प्लेटसह पाइप जप्त


 

नाशिक : महापालिकेने शहरात राबविलेल्या भुयारी गटार योजनेचे चेंबरमधील मलजल अडवून त्याचा शेतीसाठी पाणी वापरण्याचा प्रकार वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ उघड झाला आहे. अशाप्रकारे आढळलेला हा तिसरा प्रकार असून, चेंबरमध्ये अडथळे आणल्याने गटारी तुंबण्याचे प्रकार या चोऱ्यांमुळे उघड होत आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात भुयारी गटार योजना १९९७ नंतर राबविण्यात आली. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मलवाहिकांचे जाळे विस्तारण्यात येते. नेहरू नागरी अभियानांतर्गतही महापालिकेने भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक एक व दोन तयार करून त्यादेखील पूर्ण केल्या होत्या. आणखी अमृत योजनेअंतर्गतही मलवाहिका टाकण्याचा प्रस्ताव आहे. मलवाहिकांच्या माध्यमातून महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रात पाणी जाते आणि तेथे प्रक्रिया करून ते नदीपात्रात सोडले जाते. परंतु या पाण्यावर डल्ला मारण्याचे प्रकार घडत आहेत.
मनपाने सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाले आणि चेंबरची सफाई सुरू केली आहे. पंचवटी परिसरात महापालिकेने ही मोहीम राबवित असताना के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस मलवाहिकेत आणि चेंबरमध्ये पाणी येत नसल्याचे आढळल्यानंतर त्याचा शोध घेत घेत पालिकेच्या कर्मचाºयांनी सर्व चेंबर स्वच्छ केले. यावेळी वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस एका चेंबरमध्ये मोठी लोखंडी प्लेट आढळली. अशाप्रकारची प्लेट टाकल्याने पाणी अडते आणि मग ते पंपाने शेतीसाठी वापरले जाते. महापालिकेच्या कर्मचाºयांनी ही प्लेट जप्त केली आहे.
यापूर्वी म्हसरूळ आणि अंबड या दोन ठिकाणी असाच प्रकार आढळला होता. या दोन्ही प्रकरणात महापालिकेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पंचवटीतील प्लेटबाबत अद्याप पोलिसांत तक्रार दाखल नसली तरी प्लेटमधून पाणी कोण अडवत होते, याचा शोध पालिका घेत आहेत.

Web Title: Steal water from the chamber and steal water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.