सायने शिवारातून वाळू चोरी; तलाठ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 01:21 AM2021-04-26T01:21:22+5:302021-04-26T01:22:23+5:30
शहरातील सायने शिवारातून अवैध गौण खनिजाची चोरी करून नेत असताना अडविल्याने लोकांची गर्दी जमवून पळून जात सरकारी नोकरावर हल्ला केल्याप्रकरणी बापू अंबर जगताप (रा. दरेगाव) व दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तलाठी नामदेव श्रावण पवार यांनी फिर्याद दिली.
मालेगाव : शहरातील सायने शिवारातून अवैध गौण खनिजाची चोरी करून नेत असताना अडविल्याने लोकांची गर्दी जमवून पळून जात सरकारी नोकरावर हल्ला केल्याप्रकरणी बापू अंबर जगताप (रा. दरेगाव) व दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तलाठी नामदेव श्रावण पवार यांनी फिर्याद दिली.
नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकात नाराजी व्यक्त होत असताना ही घटना घडली.
सायने बुद्रुक शिवारातील दगडाच्या खाणीतून कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता, रॉयल्टी भरून न घेता दोन ट्रॅक्टरमध्ये दगड भरून त्याची चोरी करीत असताना तहसीलदारांच्या आदेशावरून फिर्यादींनी कारवाई केली. सरकारी काम करीत असताना अडथळा आणून फिर्यादी व सरकारी साक्षीदार यांना आरोपीने लोखंडी टॉमी घेऊन शर्टाची गच्ची धरून शिवीगाळ केली.
गर्दी जमवून गर्दीचा फायदा घेऊन एक हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टरमधील दगड आणि तीन लाख रुपये किमतीचे नंबर प्लेट नसलेले दोन ट्रॅक्टर घेऊन पळून गेले. अधिक तपास उपनिरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.