सुकाणू समिती संपापासून दूर राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:04 AM2017-11-02T00:04:28+5:302017-11-02T00:18:03+5:30
पुणतांबा येथील शेतकºयांनी १ जूनपासून पुकारलेल्या अभूतपूर्व शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवरच कानगाव येथील शेतकºयांनी २ नोव्हेंबरपासून संप पुकारला असून, सुकाणू समितीसह नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी या संपापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पेरणी व द्राक्ष छाटणी, औषध फवारणीची कामे जोरात सुरू असल्याने शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी संघटना संपापासून दूर राहणार आहेत. तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार सुरू राहणार असून, बाजार समितीत येणाºया मालाचे नियमित लिलाव होणार असल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली आहे.
नाशिक : पुणतांबा येथील शेतकºयांनी १ जूनपासून पुकारलेल्या अभूतपूर्व शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवरच कानगाव येथील शेतकºयांनी २ नोव्हेंबरपासून संप पुकारला असून, सुकाणू समितीसह नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी या संपापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पेरणी व द्राक्ष छाटणी, औषध फवारणीची कामे जोरात सुरू असल्याने शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी संघटना संपापासून दूर राहणार आहेत. तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार सुरू राहणार असून, बाजार समितीत येणाºया मालाचे नियमित लिलाव होणार असल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली आहे. शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी प्रथम पुणतांबा येथील शेतकºयांनी पुकारलेले आंदोलन व त्यानंतर झालेल्या घडामोडींनंतर लगोलग विविध शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने पुढाकार घेत उचलून धरलेले आंदोलन शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळवून देण्यात अपयशी ठरले. त्यामुळे दौंड येथील कानगावच्या शेतकºयांनी पुणतांब्याप्रमाणेच एकत्र येऊन संपूर्ण कर्जमाफीचा ठराव करून २ नोव्हेंबरपासून पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, नाशिकमधील शेतकरी संघटना व सुकाणू समितीने या आंदोलनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
बाजार समितीचे सर्व व्यवहार नियमित सुरू राहणार असून, शेतकºयांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रयत्नशील आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांना त्यांचा माल विक्रीसाठी आणायचा आहे त्यांनी नेहमीप्रमाणे माल बाजार समितीत आणावा. लिलाव सुरू राहणार आहेत. - शिवाजी चुंभळे, सभापती,
कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक