पुराव्यासोबतच चढणार भाजपा कार्यालयाची पायरी

By admin | Published: February 13, 2017 12:42 AM2017-02-13T00:42:14+5:302017-02-13T00:42:25+5:30

तिकीटविक्री प्रकरण : आयोगाकडून घेणार मार्गदर्शन

The step of the BJP office to step up with the evidence | पुराव्यासोबतच चढणार भाजपा कार्यालयाची पायरी

पुराव्यासोबतच चढणार भाजपा कार्यालयाची पायरी

Next


 नाशिक : भाजपाच्या उमेदवारांकडून दोन लाख रुपये घेण्याचा आणि उमेदवारीसंदर्भात दहा लाख रुपयांच्या मागणीसंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वसंत स्मृती येथे आचारसंहिता पथकाने धडक दिली, परंतु भाजपा नेत्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे हे पथक नमले. आता मात्र, व्हिडीओ आणि वृत्तपत्रातील या पक्षाच्या नाराजांचे देवाण-घेवाणीचे आरोप यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेऊन हे पथक पुढील आठवड्यात पुन्हा पक्ष कार्यालयावर धडकणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीचे वाद प्रचंड गाजले. ऐनवेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देताना मोठे आर्थिक व्यवहार झाले असे आरोप अनेक डावललेल्या गेलेल्या कार्यकर्त्यांनी केले आहेत. त्यातच भाजपाच्या वसंत स्मृती येथील कार्यालयात उमेदवारांकडून दोन दोन लाख रुपये घेण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. पाठोपाठ दहा लाख रुपये देऊनही उमेदवारी मिळाली नसल्याचा आरोप करणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्याची दखल घेत गेल्याच आठवड्यात आचारसंहिता कक्षाच्या पथकाने वसंत स्मृती या भाजपा कार्यालयावर धडक दिली होती. परंतु पक्षाचे सरचिटणीस लक्ष्मण सावजी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी भाजपा कार्यालयात तपासणीसंदर्भात काही लेखी आदेश असतील तर दाखवा, अशी भूमिका घेतल्याने पथकाला माघारी फिरावे लागले होते. त्यानंतर लेखीपत्र घेऊन येतो असे सांगणारे पथकाचे अधिकारी अद्याप भाजपा कार्यालयाच्या वाटेला गेले नाही. तथापि, आता लवकरच भक्कम खात्री आणि पुरावे घेऊन वसंत स्मृतीचे दरवाजे ठोठावणार आहे.
यासंदर्भात आचारसंहिता कक्षाच्या प्रमुख असलेल्या उपजिल्हाधिकारी सरिता नरके यांनी सांगितले की, भाजपासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पथकाने तपासणी सुरू केली आहे. संबंधित व्हिडीओ प्रकरणाची वैधता तपासण्यात येणार असून त्यानंतर वृत्तपत्रात उमेदवारांनी केलेले आरोप आणि अन्य बाबींची खात्री पटविण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेण्यात येणार असून, त्यानंतरच पथक भाजप कार्यालयात जाणार आहे.

Web Title: The step of the BJP office to step up with the evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.