सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनासाठी पायी दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 02:43 PM2019-10-02T14:43:14+5:302019-10-02T14:43:27+5:30
पांडाणे -साडेतिन शक्ती पिठापैकी आदय पिठ संबोधल्या जाणाऱ्या सप्तश्रृंगी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सव निमित्त्त भाविक गुजरात राज्यातून पायी दिंडीने गडाकडे येत आहेत.
पांडाणे -साडेतिन शक्ती पिठापैकी आदय पिठ संबोधल्या जाणाऱ्या सप्तश्रृंगी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सव निमित्त्त भाविक गुजरात राज्यातून पायी दिंडीने गडाकडे येत आहेत. वापी व बलसाड जिल्हयातील कपराडा गावातून व सुतार पाडा मार्ग दोनशे किलोमिटरचे अंतर चार मुक्काम करत सप्तश्रृंगी देवीच्या चरणी लीन होत आहे. हातात भगवी पताका , टाळ विणा ,पावरी वादय ,सप्तशंगी मातेची पालखी भालदार चोपदार व भगवतीच्या गाण्यांनी परिसर दुमदुमून गेला आहे. गडावर नवरात्र निमित्त यात्रा सुरू असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून व गुजरात राज्यातून पायी भाविक येत असतात. यावर्षी भरपूर पाऊस असल्यामुळे बरेच भाविक शेतीच्या कामात व्यस्त असल्यामुळे गडावर पायी येणाºया भाविकांची संख्या कमी झालेली असली तरी सातवी माळ ही देवीची मानली जाते.