स्टेप राइडर उपकरणाची जिल्हास्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 05:50 PM2018-12-23T17:50:35+5:302018-12-23T17:50:49+5:30

सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाने सादर केलेल्या स्टेप राईडर या उपकरणाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. २००९ पासून सलग दहा वर्षे या विद्यालयाचे उपकरण जिल्हास्तरावर निवड होत असल्याने वडांगळी विद्यालयाने नवा उच्चांक केला आहे. या यशाबद्दल तालुक्यात कौतुक होत आहे.

Step-by-step equipment selection at district level | स्टेप राइडर उपकरणाची जिल्हास्तरावर निवड

स्टेप राइडर उपकरणाची जिल्हास्तरावर निवड

Next

सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाने सादर केलेल्या स्टेप राईडर या उपकरणाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. २००९ पासून सलग दहा वर्षे या विद्यालयाचे उपकरण जिल्हास्तरावर निवड होत असल्याने वडांगळी विद्यालयाने नवा उच्चांक केला आहे. या यशाबद्दल तालुक्यात कौतुक होत आहे.
तालुक्याचे ४४ वे विज्ञान प्रदर्शन प्रवरा टेक्निकल कॉलेज चिंचोली येथे पार पडले. प्रदर्शनात वडांगळी विद्यालयाने स्टेप इन हे उपकरण सादर केले होते. हे उपकरण बहुमजली इमारतीवर अवजड सामान वाहून नेण्यासाठी उपयोगी आहे. उपकरण बनविण्यासाठी जुन्या साईकलचे व्हील, लोखंडी पाईप, बेरिंग, वापरण्यात येऊन अवघ्या दोनशे ते तीनशे रूपये खर्च आला.
विद्यालयातील विद्यार्थी सिद्धार्थ कुलथे, आयुष आहिराव, रोहित गीते या विद्यार्थ्यांनी सदर उपकरण बनविले. विज्ञान शिक्षक कल्पेश चव्हाण, मधुकर बागुल, टी. पी. सानप, जी. एस. कोरडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी उपकरण पाहून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. नगर जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, पंचायत समिती सभापती भगवान पथवे, गटशिक्षण अधिकारी शिवनाथ निर्मळ, विस्तार अधिकारी राजीव लहामगे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयाच्या या उपकरणाला बक्षीस प्रदान करण्यात आले. जिल्हा स्तरावर निवड झालेल्या या उपकरणाच्या यशाबद्दल मविप्रचे संचालक हेमंत वाजे, माजी संचालक कृष्णाजी भगत, सुदेश खुळे, मुख्याध्यापक के. एस. नवले व पर्यवेक्षक भरत कडलक आदींनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.

Web Title: Step-by-step equipment selection at district level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.