ओझर मर्चंट बँकेच्या अध्यक्षपदी कदम
By Admin | Published: October 17, 2014 11:34 PM2014-10-17T23:34:05+5:302014-10-17T23:38:51+5:30
उपाध्यक्षपदी रऊफ पापामियाँ पटेल
ओझर : येथील दि ओझर मर्चन्ट को-आॅफ बँकेच्या अध्यक्षपदी रत्नाकर कदम यांची उपाध्यक्षपदी रऊफ पापामियाँ पटेल व जनसंर्पक संचालकपदी ज्ञानेश्वर आहेर यांची अविरोध निवड झाली. संस्थेच्या सभागृहात संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत ही निवड करण्यात आली. चेअरमनपदासाठी रत्नाकर विनायक कदम यांच्या नावाची सूचना मावळते चेअरमन अरुण पवार यांनी केली. संचालक भालचंद्र कासार यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी रऊफ पटेल यांच्या नावाची सूचना मावळते व्हा. चेअरमन भारत पगार यांनी केली, त्याला लक्ष्मण जावरे यांनी अनुमोदन दिले. जनसंपर्क संचालकपदासाठी ज्ञानेश्वर आहेर यांच्या नावांची सूचना मावळते जनसंपर्क संचालक शरद गणोरे यांनी केली त्याला शरद सिन्नरकर यांनी अनुमोदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण क्षीरसागर यांनी या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. या बैठकीस संचालक रवींद्र भट्टड, विजय शिंदे, वसंत गवळी, लक्ष्मण जावरे, सुनील बाफणा, डॉ. मेघा पाटील, जिजाबाई रासकर, बँकेचे महाव्यवस्थापक पुंडलिक गवळी उपस्थित होते.
याप्रसंगी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक फेडरेशनचे उपाध्यक्ष अजय ब्रह्मेचा, जनकल्याण बँकेचे अध्यक्ष नानासाहेब सोनवणे, भास्कर कोठावदे, शशीताई आहिरे, अरुण पवार, प्रशांत अक्कर आदिंनी मनोगत व्यक्त केले. पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ओझरचे सरपंच हेमंत जाधव, माजी सरपंच राजेंद्र शिंदे, सिद्धीविनायक समूहाचे अध्यक्ष प्रभाकर आढाव, रामदास मंडलिक, ओझर नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पवार, अॅड. विजयकुमार कुलकर्णी, प्रशांत शेळके, अरविंद कदम, खलील पटेल, अमन पठाण, मनोज लढ्ढा, बाळासाहेब
कदम, हेमंत खेघर, सांडुभाई शेख, दिलीप कदम, ज्ञानेश्वर कदम, रतनकाका भट्टड, रघुनाथ चांडक, शब्बीर खाटीक, श्यामराव कदम आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
शहर परिसरात विजेचा लपंडाव सुरूच
नाशिक : शहर परिसरात वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकार सुरूच असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ऐन सणासुदीच्या काळातही विजेचा लपंडाव होत आहे. शिवाय अनेक भागात विजेचा दाब कमी अधिक होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेकांचे वीजमीटर ट्रीप होत असून, काहींचे विद्युत उपकरणे नादुरुस्त झाले आहेत. शनिवारी शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आलाा होता.
दुरूस्तीमुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र वर्षभर दर शनिवारी तांत्रिक कामे करावे लागत असतील तर कामांचा दर्जा तपासला जावा अशी मागणी त्रस्त नागरीकांनी केली आहे.