इगतपुरीत व्यापाº्यांचा कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 03:37 PM2018-09-28T15:37:55+5:302018-09-28T15:38:26+5:30
इगतपुरी: शासनाच्या ई- फार्मसी व आॅनलाइन विरोधात इगतपुरी व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष महेश श्रीश्रीमाळ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व दुकाने दिवसभर बंद ठेवुन शासनाचा निषेध करीत शहरातुन मोर्चा काढत तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदन दिले.
इगतपुरी:
शासनाच्या ई- फार्मसी व आॅनलाइन विरोधात इगतपुरी व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष महेश श्रीश्रीमाळ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व दुकाने दिवसभर बंद ठेवुन शासनाचा निषेध करीत शहरातुन मोर्चा काढत तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदन दिले. व्यापार्यांच्या या आंदोलनामुळे इगतपुरी शहरात कडकडीत बंद दिसुन आला. या बंदमध्ये शहरातील सर्वच व्यापारी सहभागी झाले होते.
वॉलमार्ट, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आदी आॅनलाइन व्यवसाय करणाऱ्या कंपनी व मॉलमध्ये विदेशी गुंतवणुकीमुळे देशास व देशातील व्यापारी यांना आर्थिक नुकसान होत आहे. असे व्यवसाय बंद करण्यात यावे, जो पर्यंत प्लास्टीकला पर्याय उपलब्ध होत नाही तो पर्यंत यातुन व्यापाºयांना सुट देण्यात यावी, जीवनावश्यक वस्तु या वायदा व्यापारातुन वगळण्यात याव्यात व्यापाº्यांना कमी व्याजदरात व सोप्या अटी शर्थीवर कर्ज उपलब्ध करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात नमुद करण्यात आल्या आहेत.
या मोर्चात इगतपुरी व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष महेश श्रीश्रीमाळ यांच्यासह पवन करवा, रमेश राठी, बन्सीलाल चांडक, रमेश चांडक, अजित लुणावत, दिपक चोरडीया, प्रितम भुतडा, चंद्रभान, गायकवाड, जवरीलाल चोरडीया, रईस शेख, दिनेश घुगे, पवन छाजेड, अशोक भाटिजा, उत्तम लुणावत, अजय गुप्ता, गंगा सालियन, राजेश मेहता, संजय परिहार, संतोष बाफणा, मनोज लुणावत, राजेश राठी, मनोज मणियार, योगेश चोपडा, मतीन शेख, जगदिश लद्दड, घनश्याम रावत, दिपक बडाया, किशोर मुथा यांच्यासह अनेक व्यापारी सहभागी झाले होते.