शिक्षकांचे ठिय्या आंदोलन
By admin | Published: May 16, 2017 12:05 AM2017-05-16T00:05:37+5:302017-05-16T00:05:58+5:30
नाशिकरोड : माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयीकृत बॅँकेतून करावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयीकृत बॅँकेतून करावे, नाशिक जिल्हा सहकारी बॅँकेत अडकलेला पैसा तातडीने मिळावा या मागणीकरिता जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी सोमवारी शिक्षण उपसंचालक रामचंद्र पवार यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शासन दरमहा जमा करते. मात्र गेल्या चार महिन्यांपासून बॅँकेने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शासनाने जमा केलेले वेतन पूर्णपणे दिले नाही.
ठिय्या आंदोलनात व्ही. के. नागरे, व्ही. के. आव्हाड, बी.जी. सानप बी.के. नागरे, व्ही.के. अलगट, संग्राम करंजकर, एन. एस. खैरनार, साहेबराव कुटे, बी.के. सानप, बी. ए. जारकर, सी.बी. पवार, आर.डी. निकम, एस.सी. आपटे, के.के. आहिरे, नीलेश ठाकूर, वाय. एस. कुलकर्णी, एस. एस. कुलकर्णी आदिंसह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दोन दिवसांत आदेश निघणार
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतर कोणत्याही राष्ट्रीयीकृत बॅँकेत वेतन काढावे यासंदर्भात जिल्हा बॅँकेने ना हरकत दाखला दिला असून, शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत कोणत्या राष्ट्रीयीकृत बॅँकेत वेतन काढले जाईल, याबाबत आदेश प्राप्त होईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक रामचंद्र पवार यांनी दिली.