अद्यापही भीती वाटत असल्याने यादीत नाव असूनही लसीकरणाचे होईना धाडस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:34+5:302021-02-06T04:23:34+5:30

नाशिक शहरातील चार केंद्रे, मालेगाव शहर परिसरातील पाच, तसेच कळवण, चांदवड, निफाड आणि येवला उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या दिवसाच्या लसीकरणाची ...

Still afraid to get vaccinated despite having a name on the list | अद्यापही भीती वाटत असल्याने यादीत नाव असूनही लसीकरणाचे होईना धाडस

अद्यापही भीती वाटत असल्याने यादीत नाव असूनही लसीकरणाचे होईना धाडस

Next

नाशिक शहरातील चार केंद्रे, मालेगाव शहर परिसरातील पाच, तसेच कळवण, चांदवड, निफाड आणि येवला उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या दिवसाच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यात लसीकरणाच्या प्रारंभिक टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्यात १३ रुग्णालयांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतरच्या टप्प्यात अजून १० रुग्णालयांचीदेखील वाढ करण्यात आली आहे. प्रारंभीच्या टप्प्यात काहींनी प्रकृतीचे कारण दिले, तर काहींनी पुढील टप्प्यात लस घेणार असल्याचे सांगून लस घेण्यास नकार दिला. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या दिवशी केवळ ५७ टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य होऊ शकले. जिल्ह्यातील लसीकरणामध्ये प्रत्येक केंद्रावर काही कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यात कुणी इतर आजाराचे कारण दिले. काही कर्मचाऱ्यांनी ॲलर्जीचे कारण सांगून नकार दिला, तर काही महिला कर्मचाऱ्यांनी मातृत्व आणि गरोदरपणाचे कारण सांगून नकार दिला.

इन्फो

राज्यात देण्यात येत असलेल्या कोरोना लसींच्या डोसमध्ये कुठेही फार मोठे दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत, तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला रुग्णालयात ॲडमिट करण्याचीदेखील वेळ आली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरण्याची आवश्यकता नसल्याचेच सिद्ध झाले आहे. लहान बाळांनादेखील कोणतीही लस दिली, तर थोडीशी रडरड करणे, ताप येणे यासारखे प्रकार घडतात. मग ही तर काेरोनासारख्या आजारावरील लस असल्याने त्यामुळे काहींना थोडेसे डोके जड होणे, हात दुखणे, असे प्रकार होऊ लागले तरी ती चिंतेची बाब नसून ती लस योग्य परिणाम करीत असल्याचे दर्शविते.

कोट

पहिल्या टप्प्यात लस घेण्याबाबत मनावर काहीसे दडपण होते. त्यामुळे ही लस आम्ही घेतली नाही. मात्र, कुणालाही फारसा त्रास झालेला नसल्याने आता पुढील टप्प्यात लस घेण्यास आम्ही तयार आहोत.

आरोग्य कर्मचारी

कोट

काही अन्य आजार असल्याने पहिल्या टप्प्यात लस घेऊन त्रास होऊ नये म्हणून पहिल्या फेरीत लस घेतली नाही. मात्र, आता आजारदेखील कमी झाला असल्याने पुढील टप्प्यात लस नक्की घेणार आहे.

-आरोग्य कर्मचारी

कोट

कोरोनाबाबत भीती होती, तसेच लसबाबतही कोणती लस मिळणार हे माहिती नसल्याने संदिग्धता होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यात लस घेण्यास नकार दिला होता. मात्र, आता पुढील फेरीत लस घेणार आहे.

-आरोग्य कर्मचारी

( ही डमी आहे.)

Web Title: Still afraid to get vaccinated despite having a name on the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.