...तरीही सासरी छळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:12+5:302021-06-16T04:20:12+5:30
लग्नानंतर सासरी कधी माहेरून हजारो ते लाखो रुपये आणण्याच्या मागणीसाठी तर कधी वाहन, घर, दुकान खरेदी करून देण्याच्या मागणीसाठी ...
लग्नानंतर सासरी कधी माहेरून हजारो ते लाखो रुपये आणण्याच्या मागणीसाठी तर कधी वाहन, घर, दुकान खरेदी करून देण्याच्या मागणीसाठी तर कधी संततीप्राप्तीच्या कारणांवरून आणि अनेकदा चारित्र्याच्या संशयावरून विवाहितांना हिंसाचाराचा सामना करावा लागतो. सासरच्या लोकांसह अनेकदा पतीदेखील संगनमत करून आपल्या पत्नीचा शारीरिक-मानसिक छळामध्ये सहभागी होत असल्याचेही बहुतांश प्रकरणांतून समोर आले आहे. दरदिवसाआड शहरातील एका पोलीस ठाण्यात तरी विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा दाखल होतो.
---इन्फो--
२० ते ३५ वर्षांच्या महिलांचा अधिक छळ
लग्नानंतर होणाऱ्या छळाला नवविवाहितांसह एक किंवा दोन अपत्यप्राप्ती झालेल्या महिलांनाही सामोरे जावे लागत असल्याचे समोर येते. नवविवाहित महिलांचे प्रमाण अधिक आहे. त्या तुलनेत ज्या दाम्पत्यांच्या विवाहाला पाच वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा महिलांच्या छळाचे प्रमाण कमी आहे. साधारणपणे २० ते ३५ वर्षे वयोगटांतील विवाहित महिलांना सासरच्या छळाचा सामना करावा लागतो.
--आलेख --
२०२० मध्ये जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे -
शहरी भागात किती- १५८
ग्रामीण भागात किती- १९३
--- (ग्रामीण भागात गुन्ह्यांचे वाढते प्रमाण)
===Photopath===
140621\14nsk_42_14062021_13.jpg~140621\14nsk_43_14062021_13.jpg
===Caption===
महिला छळ~गुन्हे