मेशीसह परिसरात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 05:47 PM2019-07-08T17:47:47+5:302019-07-08T17:48:01+5:30
मेशी : मेशीसह परिसरात अद्यापही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी आणि सर्वच ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत. मागील वर्षीचा भीषण दुष्काळ आणि या वर्षी एक महिन्याने लांबलेला पाऊस तसेच जोरदार पावसाची प्रतीक्षा यामुळे सगळ्यांचीच धाकधूक वाढली आहे.
मेशी : मेशीसह परिसरात अद्यापही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी आणि सर्वच ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत.
मागील वर्षीचा भीषण दुष्काळ आणि या वर्षी एक महिन्याने लांबलेला पाऊस तसेच जोरदार पावसाची प्रतीक्षा यामुळे सगळ्यांचीच धाकधूक वाढली आहे. मागील आठवड्यात जेमतेम पाऊस झाला. परंतु जमीनीची भूक भागेल एवढा पाऊस नसतानाही खरीपाचे पेरणीचे कामे शेतकºाांनी सुरू केली आहेत. पाऊस येईल या आशेवर पेरणी तर झाली. मात्र पावसाने पुन्हा डोळे वटारले असून बळीराजा कमालीचा धास्तावला आहे.
सध्या केवळ ढगाळ वातावरण तयार झालेले दिसत आहे. परंतु मधेच जोरदार वारा सुरू होतो आणि वातावरण बिघडते, कधी अधून मधून कडक उन्हाचे चटके बसतात. महागडी बियाणांची खरेदी करून पेरणी केली जात आहे. परंतु असेच वातावरण राहिल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहू नये यासाठी वरूणराजाला साकडे घातले जात आहे.
उशिरा पेरणीने सर्वच आगामी समीकरणे बदलणार आहेत. या भागाचे तिन्ही हंगामातील प्रमुख पिक कांदा आहे. या वर्षी पावसाळी कांदा लागवडीचे चित्र अद्याप धुसर होत आहे. कारण अद्यापही कांदा बियाणे (ऊळे) पेरणी झाली नाही. कमी पाऊस झाला म्हणून जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध नाही. यामुळे सगळ्यांचेच डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.