गंगापूर धरणाचा साठा ३२ दलघफूने वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:43 AM2020-06-05T00:43:43+5:302020-06-05T00:45:43+5:30
गंगापूर धरणक्षेत्रात गुरुवारी (दि.४) सकाळी ६ वाजेपर्यंत १२५ मिलीमीटर इतका पाऊस नोंदविला गेला. सकाळपर्यंत धरणसाठ्यात ३२ दलघफूने वाढ झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. सध्या धरण ४७.२२ टक्के भरलेले आहे.
नाशिक : गंगापूर धरणक्षेत्रात गुरुवारी (दि.४) सकाळी ६ वाजेपर्यंत १२५ मिलीमीटर इतका पाऊस नोंदविला गेला. सकाळपर्यंत धरणसाठ्यात ३२ दलघफूने वाढ झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. सध्या धरण ४७.२२ टक्के भरलेले आहे.
कश्यपी धरणाच्या क्षेत्रात ५७ मिमी इतका पाऊस पडला तर गौतमी गोदावरी धरणक्षेत्रात ३३ मिमी पाऊस झाला आणि अंबोली व त्र्यबकेशवर परिसरात प्रत्येकी ३८ मिमी इतका पाऊस झाला. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात एकूण २९१ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत झाली.
मुंबईकडून उत्तर महाराष्टÑाकडे निघालेल्या ‘निसर्ग’ चक्र ीवादळाचा प्रभाव बुधवारी (दि.३) शहरातही मोठ्या प्रमाणात जाणवला. बुधवारी सकाळपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १७ मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला. बुधवारी दुपारनंतर सरींची रिपरिप मुसळधार पावसात बदलली. त्यावेळी शहरात ताशी ३० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत होते. संध्याकाळनंतर मुसळधार वादळी पावसाने शहराला झोडपून काढले. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत जोर‘धार’ वादळी पाऊस शहरात सर्वत्र सुरू होता. रात्री साडेआठ ते साडेदहा वाजेपर्यंत ५२.३, तर साडेदहा ते साडेअकरा वाजेपर्यंत केवळ तासाभरात शहरात ६६.४ मिमी पावसाची नोंद झाली. या तीन तासांत ११८ मिमी इतका पाऊस शहरात झाला.
तसेच