गॅस चोरून सिलिंडरमध्ये भरणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:16 AM2018-05-13T00:16:22+5:302018-05-13T00:16:22+5:30

स्वयंपाकाचा एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाºया शहरातील एका एजन्सीच्या टेम्पोचालकाला गॅसचोरी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. गॅस ट्रान्सफर निप्पलद्वारे रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरणा करण्याचा त्याचा अमृतधाममधील अड्डा गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला.

 Stole gas and stole it in the cylinders | गॅस चोरून सिलिंडरमध्ये भरणाऱ्यास अटक

गॅस चोरून सिलिंडरमध्ये भरणाऱ्यास अटक

Next

नाशिक : स्वयंपाकाचा एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाºया शहरातील एका एजन्सीच्या टेम्पोचालकाला गॅसचोरी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. गॅस ट्रान्सफर निप्पलद्वारे रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरणा करण्याचा त्याचा अमृतधाममधील अड्डा गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला. विविध गॅस एजन्सीमार्फत स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर घरोघरी पोहचविणाºया काही टेम्पोचालक व त्यावरील कामगारांकडून संगनमताने गॅस चोरी करून ग्राहकांना कमी वजनाचे सिलिंडर देत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने चाचपणी सुरू केली असता मखमलाबादजवळील भारत गॅसच्या गुदामामधून घरोघरी गॅस सिलिंडर पोहचविणारा टेम्पोचालक संजय खंडूजी चव्हाण (४२, रा. विहार कॉलनी) हा संशयित टेम्पोचालक आपल्या टेम्पो (एमएच १५, एफव्ही १६४९) मध्ये सिलिंडर भरल्यानंतर ग्राहकांना सिलिंडर देण्यापूर्वी त्यामधील काही प्रमाणात गॅस राहत्या घराजवळील मोकळ्या भूखंडावर ट्रान्सफर निप्पलद्वारे रिकाम्या सिलिंडरमध्ये भरणा करत होता. त्यामुळे या भागातील नागरिकांना कमी वजनाच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा होत होता. याबाबतची गुप्त माहिती सहायक निरीक्षक दीपक गिरमे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला.
रंगेहाथ पकडले
अमृतधाम परिसरात छापा टाकून टेम्पोचालकाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून  १३ सिलिंडर, तानकाटा, गॅस ट्रान्सफर निप्पल असा एकूण दोन लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title:  Stole gas and stole it in the cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.