मदतीच्या बहाण्याने वृद्धेची पोत चोरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:26 AM2017-11-05T00:26:14+5:302017-11-05T00:26:14+5:30

अस्वस्थ वाटू लागल्याने आराम करीत असलेल्या वृद्धेस मदत करीत असल्याचे भासवून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केल्याची घटना बुधवारी (दि़ १) सायंकाळी सिडकोतील राणेनगरमध्ये घडली़

Stole the old woman's hand by boasting | मदतीच्या बहाण्याने वृद्धेची पोत चोरली

मदतीच्या बहाण्याने वृद्धेची पोत चोरली

Next

नाशिक : अस्वस्थ वाटू लागल्याने आराम करीत असलेल्या वृद्धेस मदत करीत असल्याचे भासवून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केल्याची घटना बुधवारी (दि़ १) सायंकाळी सिडकोतील राणेनगरमध्ये घडली़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवेकानंदनगरमधील रहिवासी मथुराबाई धर्मा पाटील या सायंकाळी घरासमोरील पाचोळा गोळा करून कुंडीत टाकण्याचे काम करीत होत्या़ कचरा टाकून परतत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्या दत्तमंदिराच्या पायºयांवर बसल्या़  मथुराबाई धर्मा पाटील (७१, रा. विवेकानंदनगर, राणेनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मथुराबाई बुधवारी सायंकाळी घरासमोरील पालापाचोळा गोळा करून परिसरातील कचराकुंडीत टाकण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. कचरा टाकून परतत असताना अचानक चक्कर आल्याने त्या नजीकच्या दत्तमंदिराच्या पायºयांवर बसल्या असता परिसरातील महिला व नागरिकांनी त्यांना मदत केली़ या मदत करणाºयांमध्ये असलेल्या एका भामट्याने मदतीचा बहाणा करीत पाटील यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत काढून घेतली़ या प्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 
सोन्याच्या बांगड्या पळविल्या 
विवाहितेस भुरळ घालून तिच्या हातातील लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या एका भामट्याने काढून घेतल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास पेठरोड परिसरातील नवरंग मंगल कार्यालयाजवळ घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशर प्लाझामधील रहिवासी प्रिया प्रीतेश बोरा (३२) या गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरात एकट्या होत्या़ यावेळी घराची बेल वाजल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता एका संशयित तरुणाने शेजाºयाची विचारपूस करण्याच्या बहाण्याने बोरा यांना संमोहित केले़ या युवकाने संमोहन केल्याने बोरा यांनी आपल्या हातातील ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या उतरवून या युवकाच्या ताब्यात दिल्यानंतर युवक पसार झाला़ बोरा यांच्यावरील असर कमी झाल्यानंतर तत्काळ पंचवटी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Stole the old woman's hand by boasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.