चांदोरा शिवारात चोरी; वृद्ध महिलेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:04 AM2019-01-15T01:04:38+5:302019-01-15T01:06:51+5:30

नांदगाव : तालुक्यातील चांदोरा शिवारातील शेतात शकुंतलाबाई दत्तू चव्हाण (वय ६०) या विधवा महिलेच्या घरात रविवारी (दि.१३) मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करून काठीने जबरी मारहाण करत तिला गंभीर जखमी केले. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व रोख रकमेसह एकूण ३३ हजार रूपयांचा ऐवज जबरीने लुटून नेला. जखमी महिला नांदगांव ग्रामीण रु ग्णालयात उपचार घेत आहे.

Stolen in Chindora Shivarata; Aged woman suffocated | चांदोरा शिवारात चोरी; वृद्ध महिलेला मारहाण

चांदोरा शिवारात चोरी; वृद्ध महिलेला मारहाण

Next
ठळक मुद्देऐवज लंपास : जखमी महिला रुग्णालयात

नांदगाव : तालुक्यातील चांदोरा शिवारातील शेतात शकुंतलाबाई दत्तू चव्हाण (वय ६०) या विधवा महिलेच्या घरात रविवारी (दि.१३) मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करून काठीने जबरी मारहाण करत तिला गंभीर जखमी केले. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व रोख रकमेसह एकूण ३३ हजार रूपयांचा ऐवज जबरीने लुटून नेला. जखमी महिला नांदगांव ग्रामीण रु ग्णालयात उपचार घेत आहे.
सदर महिला चांदोरा शिवारातील शेतात घर करून राहातात. रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दोघांनी ओरडून दार उघड असे म्हणत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. शकुंतलाबाई त्यावेळी नुकत्याच मयत द्रोपदाबाई घोटेकर यांचे घरून भजनाचा कार्यक्रम आटोपून येऊन झोपल्या होत्या. खबर मिळताच पोलिस निरीक्षक अनिल भवारी, उपनिरीक्षक भाईदास मालचे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचल.े त्यांनी मध्यरात्रीच परिसर पिंजून काढला. पण दरोडेखोर पसार झाले होते. दरम्यान पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने देखील चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. ओरडून शेजाºयांना हाकाप्रवेश केलेल्या चोरट्यांनी भांबावलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले ओरबाडून घेतले. तिच्या हातावर काठीने मार देऊन हातातील बांगड्या फोडल्या व घरातील मांडणीवरील डब्यातील रोख रक्कम ३ हजार रूपये काढून पोबारा केला. चोर पळाल्यावर त्यांनी जोरात ‘वाचवा वाचवा’ असे ओरडून शेजाºयांना हाका मारल्या.

Web Title: Stolen in Chindora Shivarata; Aged woman suffocated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.