सराफी दुकान फोडून दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 01:11 AM2018-11-19T01:11:50+5:302018-11-19T01:12:05+5:30

सराफी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शिवाजीनगरमधील नरसिंह ज्वेलर्समध्ये घडली आहे़

Stolen jewelery stolen from Sarai shop | सराफी दुकान फोडून दागिन्यांची चोरी

सराफी दुकान फोडून दागिन्यांची चोरी

Next

नाशिक : सराफी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शिवाजीनगरमधील नरसिंह ज्वेलर्समध्ये घडली आहे़
शिवाजीनगर येथील नितीन दिलीप दाभाडे (३१, रा. राजनदीनी व्हीला) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २९ व ३० जून या कालावधित चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला़ तसेच दुकानातील १ लाख ७६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले़ त्यामध्ये सोन्याचे झुबे, सोन्याची कान साखळी, सोन्याची पोत, सोन्याची साखळी, सोन्याचे डोरले, सोन्याची कुडके, सोन्याची बुगडी, सोन्याचे मणी, चांदीचे बाजूबंद, चांदीची तार, चांदीचे पायल बॉक्स, गाडीचे कागदपत्र, बँकेचे चेक यांचा समावेश होता़
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Stolen jewelery stolen from Sarai shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.