सटाण्यात पकडले चोरीची वाळू वाहतूक करणारे ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:50 PM2017-09-28T23:50:33+5:302017-09-29T00:08:42+5:30
तापी नदीमधून वाळू तस्करी करणारी वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. गुरुवारी दुपारी बागलाणचे प्रांत प्रवीण महाजन यांनी बोगस परवाने तयार करून वाळूची तस्करी करणारे चार ट्रक पकडले. ही कारवाई सटाणा देवळा रस्तावरील मोरेनगर नजीक करण्यात आली. या कारवाईमुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सटाणा : तापी नदीमधून वाळू तस्करी करणारी वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. गुरुवारी दुपारी बागलाणचे प्रांत प्रवीण महाजन यांनी बोगस परवाने तयार करून वाळूची तस्करी करणारे चार ट्रक पकडले. ही कारवाई सटाणा देवळा रस्तावरील मोरेनगर नजीक करण्यात आली. या कारवाईमुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
गेल्या चार महिन्यांपूर्वी जायखेडा व सटाणा पोलिसांनी वाळू तस्करी विरु द्ध संयुक्त मोहीम उघडली होती. या मोहिमेत तब्बल बारा ट्रक चोरीची व क्षमतेपेक्षा जास्त वाळू घेऊन जाणारे ट्रक पकडले होते. या कारवाईत सुमारे ४२ लाख रु पयांचा दंड महसूल विभागाने वसूल केला होता. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे अक्षरश: तोंडचे पाणी पळाले होते. मोठ्या रक्कमेच्या दंड वसुलीमुळे गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीला आळा बसला होता; मात्र गेल्या आठ दिवसांपासून वाळूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे. आज गुरु वारी दुपारी चारही मालट्रक नंदुरबारहून तापी नदीपात्रातील वाळू घेऊन जात होते. बागलाणचे प्रांत प्रवीण महाजन यांना वाळू चोरीचा संशय आल्याने त्यांनी मोरेनगरजवळ चारही ट्रक अडवून तपासणी केली असता बनावट परवाने आढळून आले. भरारी पथकाने चारही वाळूचे ट्रक जप्त केले असून सायंकाळी उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रि या सुरू होती.