बॉश प्रकरणातील संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना बनावट स्पेअरपार्ट प्रकरण : भंगार मालाचा ठेकेदार छोटू चौधरी प्रमुख संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:31 AM2018-01-06T01:31:55+5:302018-01-06T01:32:37+5:30
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील फॉल्टी स्पेअरपार्टची चोरी करून त्याची नक्कल करीत बनावट पार्ट बनवून त्यांची विक्री करणाºया टोळीचा अंबड पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला़
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील फॉल्टी स्पेअरपार्टची चोरी करून त्याची नक्कल करीत बनावट पार्ट बनवून त्यांची विक्री करणाºया टोळीचा अंबड पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला़ कंपनीतील भंगारमालाचा ठेकेदार छोटू चौधरी हा याप्रकरणातील प्रमुख संशयित असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत़ बॉश कंपनीतील अधिकाºयांनी जप्त केलेल्या स्पेअरपार्टची पाहणी केली असून, पोलिसांनी कंपनीतील सुरक्षा विभागाच्या अधिकाºयांकडून फरार चौधरीबाबत माहिती घेतली़ दरम्यान, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप करणाºयांची कसून चौकशी केली जाणार असून, चौधरीच्या अटकेनंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे़
सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश या कंपनीत डिझेल वाहनांच्या इंजिनसाठी आवश्यक असलेले नोझल्स, निडल्स, वॉल्व्ह सेट, वॉल्व्ह पीस, वॉल्व्हर पिस्टन व आदी सुटे भाग तयार केले जातात़ कंपनीतील चांगल्या व फॉल्टी स्पेअरपार्टची चोरी करून सिडकोतील पंडितनगरमध्ये कंपनीसारखेच बनावट पार्ट तयार करून त्यांची विक्री केली जात असल्याचा अंबड पोलिसांनी भांडाफोड करून १० कोटी ६६ लाख रुपये किमतीचे २३ टन वजनाचे सुटे भागही जप्त केले़ पोलिसांनी संशयित शिश अहमद अस्लम हुसेन खान (२१, रा. केवळ पार्क, अंबड-लिंक रोड) व अहमद रजा शुभराजी खान (१८, रा. संजीवनगर, अंबड-सातपूर लिंक रोड. मूळ राहणार कोहरगडी, जि. बल्लारापूर, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे़
राजकीय दबाव टाकणाºयांची होणार चौकशी
याप्रकरणातील प्रमुख संशयित व बॉश कंपनीतील भंगारमालाचा ठेकेदार छोटू चौधरी हा फरार असून, त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत़ त्याच्या अटकेनंतरच कंपनीतील स्पेअरपार्ट चोरीचे नेमके प्रकरण, त्यात सहभागी साथीदार, मोडस आॅपरेंडी याची माहिती मिळणार असल्याचे अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले़, तर या प्रकरणात राजकीय दबाव टाकणाºया लोकप्रतिनिधींचीही चौकशी केली जाणार असून, दोषी असल्यास कारवाई केली जाणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले़