बालनिरीक्षणगृहाच्या अधीक्षकासह लिपिकास कॅरमबोर्डची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 08:22 PM2018-08-21T20:22:52+5:302018-08-21T20:31:41+5:30
नाशिक : उंटवाडीतील बाल निरीक्षणगृहात दाखल मुलाचा बाल न्यायमंडळ कोर्टातून जामीन करून घेण्यासाठी आवश्यक असलेले पीओ लेटर तसेच जामीन मिळाल्यानंतर सहकार्य करून मुलास सोडण्यासाठी कॅरमबोर्डची लाच मागणाऱ्या बाल निरीक्षणगृहाच्या अधीक्षक नलिनी पाटील व लिपिक प्रशांत देसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़२१) रंगेहाथ पकडले़

उपअधीक्षक विश्वजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराचा मुलास बाल न्यायमंडळाच्या आदेशाने उंटवाडीतील बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले होते़ या मुलाचा बाल न्यायमंडळ कोर्टातून जामीन करून घेण्यासाठी बालसुधारगृह अधीक्षक यांच्याकडून पीओ लेटर देण्याकरिता व जामीन मिळाल्यानंतर सहकार्य करून मुलास सोडण्यासाठी अधीक्षका पाटील व लिपिक देसले यांनी कॅरमबोर्डची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीवरून मंगळवारी (दि़२१) सापळा रचून पडताळणी केली असता अधीक्षक पाटील व लिपिक देसले यांनी तक्रारदाराकडे लाचेच्या स्वरूपात कॅरमबोर्डची मागणी केली़ तसेच निरीक्षणगृहात तक्रारदाराकडून कॅरमबोर्ड स्वीकारला असता त्यांना अटक करण्यात आली़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़