चारचाकीने घेतला अचानक पेट
By admin | Published: May 21, 2017 01:11 AM2017-05-21T01:11:45+5:302017-05-21T01:12:01+5:30
नाशिक : द्वारकेजवळील उभ्या असलेल्या फोर्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर कंपनीच्या तेरा सिटर वाहनास (जीजे १, सीएक्स ९९९१) शनिवारी (दि़२०) रात्री आग लागली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : द्वारकेजवळील बेला पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या फोर्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर कंपनीच्या तेरा सिटर वाहनास (जीजे १, सीएक्स ९९९१) शनिवारी (दि़२०) रात्री ८ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ यावेळी प्रसंगावधान राखत वाहनातील तेराही प्रवासी खाली उरतल्याने बचावले, तर शिंगाडा तलावावरील मुख्य अग्निशमन केंद्रातील जवान त्वरित घटनास्थळी पोहोचले व त्यांनी एका बंबाच्या साहाय्याने ही आग विझविली़
गुजरातमधील दीपक सोनी हे आपल्या कुटुंबातील तेरा सदस्यांसह नाशिकला आले होते़ रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी आपले वाहन द्वारकाजवळील बेला पेट्रोल पंपाजवळ उभे केले असता त्यास अचानक आग लागली़ यावेळी वाहनात तेरा प्रवासी व ड्रायव्हर राजेश वाघेलाही होता़ मात्र आग लागल्याचे दिसताच या सर्वांनी प्रसंगावधान राखत वाहनातून खाली उतरल्याने बचावले़ दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान त्वरित घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले़ मात्र या टेम्पो ट्रॅव्हलर वाहन अर्धे जळाले असून, आर्थिक नुकसान झाले आहे़
या आगीमुळे पोलिसांनी कोठ गल्ली ते सारडा सर्कल या दरम्यानची वाहतूक बंद केली होती़ यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडीही झाली़ दरम्यान, जवळच पेट्रोलपंप असल्याने आगीवर नियंत्रण मिळाले नसते तर मोठा अनर्थ घडला असता़ दरम्यान, या घटनेची भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़