पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:17 AM2021-09-22T04:17:07+5:302021-09-22T04:17:07+5:30
कामगार - कंपनीत काम करत असल्यामुळे पगारामधूनच आमचा प्रोफेशनल टॅक्स आणि लागू असेल तर इन्कम टॅक्स कापला जातो. ऑटो ...
कामगार - कंपनीत काम करत असल्यामुळे पगारामधूनच आमचा प्रोफेशनल टॅक्स आणि लागू असेल तर इन्कम टॅक्स कापला जातो.
ऑटो चालक - माझे उत्पन्न खूप नाही त्यामुळे मी टॅक्स भरत नाही.
भाजीपाला विक्रेता- रोज कमवतो अन् रोज खातो तेव्हा टॅक्स कुठून भरणार आणि कसा भरणार
फेरीवाला- दिवसभरात किमान ५०-६० किमीची पायपीट करावी लागते तेव्हा हातातोंडाची गाठ पडते.
सिक्युरिटी गार्ड - कंपनीतर्फे कामाला असल्यामुळे प्रोफेशनल टॅक्स द्यावा लागतो.
साफसफाई कामगार - पगारपत्रकातच टॅक्स कापून घेतला जातो. वेगळा टॅक्स आम्ही भरत नाही.
सलून चालक- अनेकवेळा बँकेकडून कर्ज घ्यावे लागते त्यासाठी इन्कम टॅक्स भरावा लागतो. तरच बँक कर्ज देत असते.
लॉन्ड्री चालक - आमचा मोठा व्यवसाय नाही. वार्षिक उत्पन्न फार नसल्यामुळे इन्कम टॅक्स लागत नसले तरी महापालिकेचे कर भरावेच लागतात. त्यातून सुटका नाही.
घरकाम करणाऱ्या महिला - चार घरची धुणी, भांडी करते तेव्हा महिन्याला ८-१० हजार रुपये मिळतात. टॅक्स कुठून भरणार
चौकट-
प्रत्येकजण टॅक्स भरतो
अनेक लोक प्रत्यक्ष कर भरत नसले तरी अप्रत्यक्षपणे ते वेगवेगळ्या स्वरुपात कर भरत असतात. वस्तू खरेदी करताना त्यांना जीएसटी द्यावा लागतो. ते वस्तूंच्या किमतीमध्येच समाविष्ट असल्यामुळे आपण टॅक्सही भरतो आहोत हे अनेकांना कळतही नाही. श्रीमंत असो की गरीब अप्रत्यक्षपणे टॅक्स कुणालाही चुकलेला नाही. काही लोकांना वेगवेगळ्या कारणांसाठी इन्कम टॅक्सची फाईल लागत असते यासाठी ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन्हीही टॅक्स भरत असतात. - हेरंब गोविलकर, अप्रत्यक्ष कर तज्ज्ञ, नाशिक