गोदातीरावरील कपालेश्वर मंदिराचा दगड कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:52 IST2019-08-03T01:51:55+5:302019-08-03T01:52:18+5:30
पावसाची संततधार सुरूच असून जूने आणि वास्तु पडत आहेत. शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा घाटावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या मागील बाजूचा घुमटाकार जवळ असलेला दगड २० ते २५ फुटावरून खाली कोसळण्याची घटना शुक्रवारी (दि.२) दुपारी घडली

गोदातीरावरील कपालेश्वर मंदिराचा दगड कोसळला
पंचवटी : श्हरात पावसाची संततधार सुरूच असून जूने आणि वास्तु पडत आहेत. शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा घाटावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या मागील बाजूचा घुमटाकार जवळ असलेला दगड २० ते २५ फुटावरून खाली कोसळण्याची घटना शुक्रवारी (दि.२) दुपारी घडली सुदैवाने दगड मंदिराच्या मागील बाजूस कोसळला त्यावेळी कोणीही भाविक नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
याबाबत समजलेली माहिती अशी की गंगाघाटावर पुरातन महादेव कपालेश्वर मंदिर असून, पूर्णत: दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या पाठीमागील भागाकडे घुमटाकार कळसाचा मोठा चौकोनी दगड दुपारी अचानक बांधकामातून कोसळला. गेल्या काही दिवसांपासून नाशकात पाऊस सुरू असून, त्यामुळे सर्वत्र ओल आलेली आहे. मंदिर पुरातन असल्याने त्याची डागडुजीही केली गेलेली नाही. त्यामुळे पावसामुळे मंदिराची भिंत भिजून सदर दगड कोसळला असावा अशी शक्यता परिसरात राहणाऱ्या ब्रह्मवृंदांनी वर्तविली आहे. ज्यावेळी मंदिराचा दगड कोसळला त्यावेळी पावसाची रिपरिप सुरू असल्याने कोणीही भाविक मंदिर परिसरात मागील बाजूस उभे नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
सुमारे २० ते २५ फुटावरून दगड खाली कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी लागलीच मंदिराबाहेर धाव घेतली तर परिसरात राहणाºया काही नागरिकांनी घटनास्थळी जाऊन दगड पडला त्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स टाकून नागरिकांना मंदिराला प्रदक्षिणा मारताना लांबून जावे अशा सूचना करत होते.
पाऊस सुरू असताना मंदिरात भाविकांची गर्दी कमी होती. घुमटाकार जवळून दगड कोसळला त्यावेळी मंदिराच्या मागील बाजूस कोणीही भाविक नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र ऐन श्रावणात महादेवाचे स्थान असलेल्या कपालेश्वर मंदिराच्या कळसाचा दगड पडण्याच्या घटनेबद्दल उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे.