कचेरीरोड परिसरात सप्ताहापासून दगडांचा मारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:15 AM2021-03-14T04:15:20+5:302021-03-14T04:15:20+5:30
परिसराचे नगरसेवक राकेश खैरनार, भारतीताई सूर्यवंशी आदींसह शेकडो युवक रात्रभर गस्त घालत आहेत. परिसरातील अनेक महिलांनीदेखील या प्रकाराबाबत ...
परिसराचे नगरसेवक राकेश खैरनार, भारतीताई सूर्यवंशी आदींसह शेकडो युवक रात्रभर गस्त घालत आहेत. परिसरातील अनेक महिलांनीदेखील या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून कायदा व सुव्यस्थेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. गत शनिवारपासून सुरू असलेली ही दगडफेक सलग सातव्या दिवशी शुक्रवारपर्यंत (दि.१२) सुरूच आहे.
दीडशे ते दोनशे युवकांचा परिसरात व घरांच्या छतावर खडा पहारा असतानादेखील दर दहा- पंधरा मिनिटांत दगड पडण्याचा आवाज येतो आहे. सटाणा पोलिसांकडे स्थानिक नागरिकांनी या घटनेची तक्रार केली असता पोलीसदेखील या परिसरात दोन तीन वेळा गस्त घालून गेले मात्र पोलिसांसमोरदेखील ही दगडफेक होत आहे. रात्रीचे ८ वाजले की कचेरीरोड परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली जात असून, परिसरातील लहान बालकांना सातच्या आत घरात राहावे लागत आहे. गंभीर बाब म्हणजे एका घरावर दगडफेक होताच स्थानिक युवक दगड येण्याच्या दिशेने धाव घेताच विरुद्ध दिशेच्या घरावर दगडफेक होत असल्याने सगळेच चक्रावून जात आहेत. या गंभीर प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणी कचेरी रोड परिसरातील नागरिकांनी केली आहे.
इन्फो
महिला, तरुणींमध्ये प्रचंड भीती
सात दिवसांपासून सुरू असलेल्या दगडफेकीमुळे प्रभागातील महिला व युवती प्रचंड दहशतीत आहेत. रात्री ८ वाजले की कुठे आणि केव्हा दगड पडेल याचा नेम नाही. अनेक महिलांनी फोन करून याबाबत तक्रारी केल्या असून, येत्या दोन दिवसांत या गंभीर प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावावा अन्यथा पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांच्याकडे कैफियत मांडावी लागेल.
- भारती सूर्यवंशी, नगरसेविका
सात दिवसांपासून रात्रभर जागरण मी स्वतः आणि माझ्या प्रभागातील दीडशे ते दोनशे युवक रात्रभर कचेरीरोड परिसरात गस्त घालत आहोत. मात्र कधीही कोणत्याही दिशेने दगड येत असल्याने आम्ही चक्रावून गेलो आहोत. प्रकरण गंभीर असून, सटाणा पोलिसांनी याकडे लक्ष घालून संबंधित माथेफिरूचा शोध घ्यावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.
- राकेश खैरनार, नगरसेवक
फोटो- १३ सटाणा क्राइम
===Photopath===
130321\13nsk_48_13032021_13.jpg
===Caption===
फोटो- १३ सटाणा क्राइम