सातपूरच्या प्रबुध्दनगरमध्ये दोन गटांत दगडफेक; २८ संशयित अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 07:10 PM2020-05-05T19:10:14+5:302020-05-05T19:11:15+5:30

सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रबुद्धनगर झोपडपट्टीत अवैध मद्य विक्र ी होत असल्याची तक्र ार येथील रहिवााशांनी पोलिसांकडे वेळोवेळी केली आहे. दगडफेकीची घटना घडली

Stone-throwing in two groups at Prabudhnagar in Satpur; 28 suspects arrested | सातपूरच्या प्रबुध्दनगरमध्ये दोन गटांत दगडफेक; २८ संशयित अटकेत

सातपूरच्या प्रबुध्दनगरमध्ये दोन गटांत दगडफेक; २८ संशयित अटकेत

Next
ठळक मुद्देदोन्ही गटातील ३१ पैकी २८ संशियतांना अटक केली आहे.

नाशिक : येथील प्रबुद्धनगरातील सार्वजनिक शौचालय वापरावरु न दोन गटात झालेल्या वादातून तुफान दगडफेक करण्यात आल्याने दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्र ार दाखल केली आहे.तर सातपूर पोलिसांनी दोन्ही गटातील ३१ पैकी २८ संशियतांना अटक केली आहे.
़़प्रबुद्धनगरातील राहिवाश्यांसाठी एका खासगी कंपनीने येथील चौकात सार्वजनिक शौचालय बांधून दिलेले आहे. जवळच असलेल्या पालवे आणि मांजरे परिवारास पवार आणि खोडे परिवाराचा शौचालय वापरास विरोध होता. सोमवारी रात्रीच्या वेळी हा वाद विकोपास गेला. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याने दोन्ही गटांतील काही महिला व पुरु ष जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी रात्रीच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी पोलीस फौजफाट्यासह प्रबुद्धनगरात धाव घेतली. तसेच उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशीदेखील घटनास्थळी तत्काळ पोहचले. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणणात आणली. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील ३१ पैकी २८ संशयितांना अटक करु न मंगळवारी न्यायालयात हजर केले असून उर्वरित तिघांचा शोध घेत आहेत.

सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रबुद्धनगर झोपडपट्टीत अवैध मद्य विक्र ी होत असल्याची तक्र ार येथील रहिवााशांनी पोलिसांकडे वेळोवेळी केली आहे. दगडफेकीची घटना घडली त्याच्या दोन दिवस अगोदर अवैध दारु विक्र ी करणाऱ्यांना लोकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून दोन गटांत हाणामारी झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. अवैध मद्यविक्र ी करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यास अशाप्रकारचे वाद होतच राहतील अशीही चर्चा आहे.

Web Title: Stone-throwing in two groups at Prabudhnagar in Satpur; 28 suspects arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.