‘तोंडावर मास्क लावा’ असे सांगणाऱ्या पोलिसावर भिरकावले दगड अन् फाडली वर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 01:53 PM2020-07-20T13:53:50+5:302020-07-20T13:57:23+5:30

कोरोनाचे संक्रमण शहरात वेगाने होत असल्यामुळे आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावणे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बंधनकारक केले आहे.

Stones hurled at police for saying 'put a mask on your face' | ‘तोंडावर मास्क लावा’ असे सांगणाऱ्या पोलिसावर भिरकावले दगड अन् फाडली वर्दी

संग्रहित छायाचित्र

Next
ठळक मुद्देम्हसरूळ पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क बंधनकारक

नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावून घरी परतत असताना वाटेत सार्वजनिक ठिकाणी चौघांचे टोळके मास्कविना सर्रासपणे वावरत असल्याचे निदर्शनास आल्याने त्या कर्मचा-याने त्यांना समज देत ‘तोंडावर मास्क, रूमाल लावा’ असे सांगताच त्याचा राग मनात धरून त्यांनी पोलिसावर दगड भिरकावले तसेच वर्दीचेही नुकसान केल्याची घटना घडली.
म्हसरूळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी शिपाई फिर्यादी जिभाऊ चौरे हे आपल्या घरी जात असताना रस्त्यात त्यांना संशयित आरोपी धनराज गोकुळ लांडे, सुशांत संतोष खरे, फैजल कयूम शेख आणि विठ्ठल राजाराम साळवे हे चौघे विना मास्क वावरत असल्याचे लक्षात आले. सध्या कोरोनाचे संक्रमण शहरात वेगाने होत असल्यामुळे आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावणे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बंधनकारक केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द पोलीस, महापालिका प्रशासनाकडून थेट कारवाई केली जात आहे. दरम्यान, या चौघांना या आदेशाचे पालन करण्याबाबत चौरे यांनी सांगितले असता, चौघांनी त्याकडे दुर्लक्ष करत त्यांच्या दिशेने रस्त्यालगत पडललेले दगड उचलून भिरकावले. यावेळी ते जखमी झाले. तसेच्या त्यांच्या अंगावर धावून जात वर्दीचेही नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चौरे यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिसांनी या चौघांविरूध्द शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरिक्षक एस.वाय.पाटील हे करीत आहेत.


 

 



 

Web Title: Stones hurled at police for saying 'put a mask on your face'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.