दगडफेकीची घटना : तणावपूर्ण स्थितीत जुन्या नाशकातील धार्मिक स्थळे हटवली अतिक्रमण मोहिमेला गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:29 AM2017-11-17T00:29:49+5:302017-11-17T00:32:11+5:30

नाशिक : महापालिकेमार्फत गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळविरोधी कारवाईला गुरुवारी (दि.१६) जुने नाशिक परिसरात गालबोट लागले. नानावली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यास सुरुवात झाल्याने पथकावर दगडफेक करण्यात आली. व परिसरातील विद्युतप्रवाहही खंडीत करण्यात आला. त्यामुळे संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तणावपूर्ण स्थितीतच महापालिकेच्या पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही रात्री १० वाजता पूर्ण केली.

Stoning incident: In old age, religious places of old Nashik have been demolished. | दगडफेकीची घटना : तणावपूर्ण स्थितीत जुन्या नाशकातील धार्मिक स्थळे हटवली अतिक्रमण मोहिमेला गालबोट

दगडफेकीची घटना : तणावपूर्ण स्थितीत जुन्या नाशकातील धार्मिक स्थळे हटवली अतिक्रमण मोहिमेला गालबोट

Next
ठळक मुद्देतणावपूर्ण स्थितीत जुन्या नाशकातील धार्मिक स्थळे हटवली नाशिक : अतिक्रमण मोहिमेला गालबोट


अतिक्रमण पथकावर दगडफेक करणाºया जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर नानावली परिसरात शांतता पसरली. जमावाच्या धावपळीत रस्त्यावर चपला आणि दगड पडलेले होते.
 

नाशिक : महापालिकेमार्फत गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळविरोधी कारवाईला गुरुवारी (दि.१६) जुने नाशिक परिसरात गालबोट लागले. नानावली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यास सुरुवात झाल्याने पथकावर दगडफेक करण्यात आली. व परिसरातील विद्युतप्रवाहही खंडीत करण्यात आला. त्यामुळे संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तणावपूर्ण स्थितीतच महापालिकेच्या पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही रात्री १० वाजता पूर्ण केली.
न्यायालयाच्या निर्देशानुसार, महापालिकेने दि. ८ नोव्हेंबरपासून रस्त्यांवर अडथळा ठरणाºया अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे. सिडको, सातपूर, पश्चिम आणि पंचवटी विभागातील सुमारे दीडशे अनधिकृत धार्मिक स्थळे किरकोळ विरोध वगळता शांततेच्या वातावरणात जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान, पूर्व विभागातील सात अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईविरोधी संबंधित विश्वस्तांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली गेल्यानंतर महापालिकेच्या पथकाने गुरुवारी (दि.१६) सदर अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई सुरू केली. महापालिकेने मुंबई नाका परिसरातील धार्मिक स्थळापासून कारवाईला प्रारंभ केला. त्यानंतर संवेदनशील समजल्या जाणाºया भारतनगरमधील अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम परिसरातील तरुणांनी स्वत:हून काढून घेतले.
महापालिकेचे पथक पोहोचेपर्यंत निम्म्याहून अधिक बांधकाम काढून घेण्यात आले होते. धार्मिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी सामंजस्याची भूमिका बजावली.तासाभरात परिस्थिती नियंत्रणात नानावलीमधील धार्मिक स्थळाच्या आवारात महिला भाविकांनी ठिय्या देत विरोध दर्शविल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास येथील धार्मिक स्थळ हटविण्यासाठी अतिक्रमण पथक दाखल होताच महिलांनी आक्रोश सुरू केला. त्यामुळे वातावरण तापल्याने जमावाला शांत करण्यासाठी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, मौलाना आसिफ इकबाल, मीर मुख्तार अशरफी यांनी ध्वनिक्षेपकांवरुन आवाहन सुरू केल. मात्र काही समाजकंटकांनी पथकावर दगडफेक सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांचा पुरेसा फौजफाटा असल्याने अवघ्या तासाभरात परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.धर्मगुरूंकडून जमावाचे प्रबोधनमहापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर भारतनगर परिसरात काहीकाळ तणावाची स्थिती होती. यावेळी धर्मगुरूंनी घटनास्थळी जाऊन जमलेल्या जमावाला कायदा आणि न्यायालयाचा आदेश समजावून सांगितला आणि त्यांचे प्रबोधनही केले. जुन्या नाशकातील नानावली परिसरातही तणावाची स्थिती बनल्याने धर्मगुरूंनी उपस्थित जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. या जमावात मोठ्या संख्येने महिलांचा समावेश होता.दोन पोलीस कर्मचाºयांसह
एकजण जखमीनानावलीचे धार्मिक स्थळ हटविताना झालेल्या दगडफेकीत एका पोलीस अधिकाºयासह कर्मचारी व एक नागरिक जखमी झाले आहेत. दोन पोलीस वाहनांसह अग्निशामक दलाच्या वाहनाचीही काच फुटली. जखमींना तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले. दंगल नियंत्रण पथकाने जमावावर लाठीमार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यावेळी जमावाने पळ काढत
रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी पाडून देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. तणावपूर्ण वातावरणात कार्यवाही पार पडली.नानावलीत दगडफेकीमुळे काहीकाळ तणाव न्यायालयाने याचिका फेटाळल्याने ‘त्या’ अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध पालिकेने गुरूवारी मोहीम हाती घेतली. सकाळी मोहिमेला शांततेत सुरूवात झाली; मात्र नानावली भागात दगडफेकीमुळे गालबोट लागले. सकाळपासून धर्मगुरूंकडून शांततेचे आवाहन केले जात होते. त्यामुळे सहाही धार्मिक स्थळांवरील कार्यवाही शांततेत पूर्ण झाली. बहुतांश भागात स्थानिकांनी पुढाकार घेत धार्मिक स्थळांचे बांधकाम काढून घेतले; मात्र अखेरचे सातवे धार्मिक स्थळ हटविताना दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

Web Title: Stoning incident: In old age, religious places of old Nashik have been demolished.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.