कारवाई थांबवा अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:06 AM2018-06-26T01:06:03+5:302018-06-26T01:06:52+5:30
नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात लागू केलेल्या प्लास्टिकबंदीची २३ जूनपासून अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयांनी व्यापाºयांना दंड करण्याचा धडाका लावल्याने संतप्त झालेल्या व्यापाºयांनी राज्य सरकार तथा महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात लागू केलेल्या प्लास्टिकबंदीची २३ जूनपासून अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयांनी व्यापाºयांना दंड करण्याचा धडाका लावल्याने संतप्त झालेल्या व्यापाºयांनी राज्य सरकार तथा महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी आणण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी वर्ग एकवटण्यास सुरुवात झाली असून, सरकारच्या निर्णयाविषयी भूमिका निश्चित करण्यासाठी सोमवारी (दि.२५) व्यापाºयांची बैठक बोलाविण्यात आली होती. परंतु, या बैठकीत महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पी. एम. जोशी यांनी व्यापाºयांच्या समस्या व अडचणींवर कोणतेही भाष्य न करता केवळ शासन निर्णय व अंमलबजावणीच्या तरतुदी सांगण्याचा रेटा लावला. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाºयांनी प्लॅस्टिकविरोधी कारवाई बंद करण्याची जोरदार मागणी के ली. परंतु, या संदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगत अधिकाºयांनी हतबलता दाखवल्याने व्यापारी आक्रमक झाले. यावेळी माजी उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा यांनी मध्यस्थी करीत व्यापाºयांची समजूत घातली. तसेच अधिकाºयांकडून मिळणाºया माहितीनंतर व्यापाºयांना नेमक्या काय समस्या येत आहेत ते मांडण्याचा पर्याय सुचवल्यानंतर व्यापाºयांनी संयमी भूमिका घेत आम्ही प्लॅस्टिकबंदीच्या विरोधात नसून कोणताही व्यापारी पर्यावरण विरोधी नाही. मात्र शासनाने प्रथम प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करावा, त्यानंतरच प्लास्टिकबंदी लागू करावी, अशी मागणी व्यापाºयांनी केली. दरम्यान व्यापाºयांनी सामंज्यस्याची भूमिका घेत जोपर्यंत सरकार या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढीत नाही, तोपर्यंत महापालिकेने कारवाई कारवाई थांबवावी अन्यथा शहरातील व्यापारी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा व्यापाºयांनी दिला. यावेळी कापड व्यापारी संघटनेचे अद्यक्ष दिग्वीजय कापडिया, अनिल लोढा, खुशाल पोद्दार, सोनल दगडे, बकेश पटेल, प्रफुल्ल संचेती आदी व्यापारी उपस्थित होते. सकारात्मक तोडग्याचे प्रयत्नमहाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनीही व्यापाºयांशी संवाद साधताना २० जून रोजी मंत्रालयात बेकरी असोसिएशन व किरकोळ व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत प्लास्टिक बंदीविषयी सरकारने दिलेल्या आश्वासनावर अद्याप निर्णय घेतलेले नाहीत. त्यामुळे प्लॅस्टिकबंदी तरतुदींमध्ये आणखी काही सुधारणा होणे शक्य असल्याचे सांगतानाच मंगळवारी (दि.२६) मंत्रालयात प्रदक्त समितीसोबत होणाºया बैठकीत व्यापाºयांच्या समस्या मांडून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.