संतप्त मनेगावकरांचे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 05:52 PM2018-09-15T17:52:52+5:302018-09-15T17:53:13+5:30

सिन्नर : मनेगाव गावासह वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतांना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत मनेगाव ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी अचानक नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

Stop the agitation of angry Manegaonkar's highway | संतप्त मनेगावकरांचे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

संतप्त मनेगावकरांचे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

Next

सिन्नर : मनेगाव गावासह वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतांना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत मनेगाव ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी अचानक नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या रास्ता रोको आंदोलनात अडकलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेत जिल्हाधिकाऱ्यांसोबत फोनवरुन चर्चा करुन तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. दोन दिवसात टॅँकर सुरु करण्याचे आश्वासन या बैठकीत मिळाले.
मनेगाव येथे गेल्या वर्षापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांसह वाड्या-वस्त्यांवर राहणाºया ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. मनेगावसह सोळागाव नळपाणीपुरवठा योजनेत गावाचा समावेश असून योजनेचे पाणी वाड्यावस्त्यांवर अद्यापर्यंत पोहचले नाही. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने वस्तीवरील विहीरींनी तळ गाठला आहे. परिसरात पाण्याचा कुठेच स्त्रोत नसल्याने महिलांना व ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गत वर्षापासून वाड्यावस्त्यांचे टॅँकर बंद असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी १ सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन टॅँकर सुरु करण्यासह मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी गावापर्यंत पोहचविण्याची मागणी केली होती. निवेदन देतांनाच आठ दिवसात टॅँकर सुरु न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र निवेदन देऊनही १५ दिवस उलटल्यानंतर प्रशासनाकडून दखल घेतली न गेल्याने ग्रामस्थांच्या संतापात भर पडली.
राष्टÑवादी कॉँग्रेसचे राजाराम मुरकुटे यांच्या नेतृत्त्वाखाली सकाळी १० वाजेच्या सुमारास महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात टाळे ठोकले. त्यानंतर महिला व ग्रामस्थांनी नाशिक-पुणे महामार्गावर गुरेवाडी फाट्यावर जावून सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानक रास्ता रोको आंदोलनास प्रारंभ केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव पाटील यांच्यासह कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेवून आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर हटविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी रास्ता रोको आंदोलनात अडकलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील अर्धा किलोमीटर पायी चालत आले व त्यांनी मनेगावच्या आंदोलकर्त्यांसोबत संवाद साधला.
गेल्या अनेक दिवसांपासून मनेगावकर टंचाईचा सामना करीत असून पाणीयोजनेचा बोजवारा उडाल्याने व टॅँकर सुरु होत नसल्याने ग्रामस्थांना रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हाधिकाºयांना फोन लावून आंदोलनाची माहिती दिली. पाणीप्रश्न मिटविण्यासाठी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने बैठक लावण्याची सूचना त्यांनी केली. ग्रामस्थांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. त्यानंतर चार-पाच ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीस येण्यास सांगितले.

विखेपाटील यांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
दुपारी राधाकृष्ण विखेपाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, प्रांताधिकारी महेश पाटील, सिन्नरचे तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी लता गायकवाड, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीस राजाराम मुरकुटे, अ‍ॅड. संजय सोनवणे यांच्यासह मनेगावचे काही ग्रामस्थ उपस्थित होते.
दोन दिवसात वाड्या-वस्त्यांना सुरु होणार टॅँकर
मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी दुरुस्त करण्यासह योजनेचे पाणी तीन दिवसातून मनेगाव येथे पोहचले पाहिजे, यासाठी मजीप्रच्या अधिकाºयांनी लक्ष घालावे व दोन दिवसांत टॅँकर सुरु करावा अशा सूचना विखे-पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकाºयांनीही टॅँकर सुरु करण्यासाठी आश्वासन दिले. त्यामुळे येत्या दोन दिवसात वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणी सुरु होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ग्रामपंचायत कार्यालयास टोकले टाळे
पंधरा दिवसांपूर्वी तहसील कार्यालय व पंचायत समितीला निवेदन देऊनही टॅँकर सुरु होत नसल्याने महिला व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनापूर्वी मनेगाव ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून आपला रोष व्यक्त केला. यावेळी राजाराम मुरकुटे यांच्यासह मयूर शिरसाठ, मदन सोनवणे, भानुदास सोनवणे, सूरज सोनवणे, दिगंबर सोनवणे, संजय गांजवे, भाऊसाहेब शिंदे, सुमन शिंदे, भागाबाई सोनवणे, अनिता सोनवणे, मधुकर सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. त्यानंतर महामार्गावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.


 

Web Title: Stop the agitation of angry Manegaonkar's highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप