विंचूर येथे सर्वपक्षीय रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:55 AM2017-10-26T00:55:48+5:302017-10-26T00:55:53+5:30
विंचूर-लासलगाव रस्ता दुरुस्ती करण्यासाठी वेळोवेळी तोंडी, लेखी निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल न घेतल्याने बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास येथील तीन पाटीवर सुमारे एक तास सर्व पक्षांच्या पदाधिकाºयांच्या वतीने रास्ता रोको करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता लिंबादास बोरसे यांना निवेदन देण्यात आले.
विंचूर : विंचूर-लासलगाव रस्ता दुरुस्ती करण्यासाठी वेळोवेळी तोंडी, लेखी निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल न घेतल्याने बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास येथील तीन पाटीवर सुमारे एक तास सर्व पक्षांच्या पदाधिकाºयांच्या वतीने रास्ता रोको करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता लिंबादास बोरसे यांना निवेदन देण्यात आले. विंचूर-लासलगाव रस्ता अत्यंत खराब झाला आहे. सदर रस्त्याने गाडी चालविणे दूरच पायी चालणेदेखील अवघड झाले आहे. दोन-तीन फुटांवर मोठ मोठे खड्डे असल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खोलवर खड्डे पडले आहेत. लासलगाव कांदा मार्केटमध्ये जाण्यासाठी याच रस्त्यावरून शेकडो वाहनांची वर्दळ असते. लासलगाव शहराला अनेक खेडी जोडली आहेत; मात्र रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागास अनेकदा निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी एकत्र येत सुमारे अर्धा ते पाऊण तास तीन पाटीवरजवळ नाशिक - औरंगाबाद महामार्ग अडवून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे, माजी सदस्य राजाराम दरेकर, माजी सरपंच अविनाश दुसाने तसेच डॉ. रमेश सालगुडे यांनी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा निवेदने दिली; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. लासलगाव येथे मुख्यमंत्री दौºयावर येत असताना आम्ही त्यांचा ताफा अडवणार होतो; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले असल्याने आम्ही माघार घेतली. या घटनेला दोन महिने झाले; मात्र अजूनही रस्ता दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही, असे राजाराम दरेकर यांनी सांगितले.
व्यक्त केले.