नांदगावी विद्यार्थिनींचा बस रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 02:21 PM2018-10-04T14:21:23+5:302018-10-04T14:21:36+5:30
नांदगांव : आगारातले विद्यार्थ्यांसाठी असलेले पास संपले.... पास नसल्याने बसमध्ये वाहकाकडून हिडीसफिडीस वागणूक मिळते. प्रसंगी उतरवून दिले जाते. अशा तक्र ारी घेऊन न्यू इंग्लिश स्कूलच्या सुमारे २५० विद्यार्थिनींनी बस स्टेशन मध्ये जाऊन बसेसचा मार्ग रोखल्याने परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.
नांदगांव : आगारातले विद्यार्थ्यांसाठी असलेले पास संपले.... पास नसल्याने बसमध्ये वाहकाकडून हिडीसफिडीस वागणूक मिळते. प्रसंगी उतरवून दिले जाते. अशा तक्र ारी घेऊन न्यू इंग्लिश स्कूलच्या सुमारे २५० विद्यार्थिनींनी बस स्टेशन मध्ये जाऊन बसेसचा मार्ग रोखल्याने परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. १५ सप्टेंबर रोजी नांदगाव आगारात पास संपले. तेच पास वापरा असा अनाहूत सल्ला विद्यार्थ्यांना दिला गेला. मात्र प्रत्यक्षात वेगवेगळ्या वाहकांनी वेगळी वागणूक दिल्याने विद्यार्थी अपमानित व निराश झाले. गुरूवारी नवीन पास शिवाय गाडीत चढू दिले जात नव्हते. म्हणून विद्यार्थी संतापले व त्यांनी थेट बस स्थानकावर येऊन हल्लाबोल केला. तेव्हा कुठे प्रशासनास जाग आली व त्यांनी नवीन पास जारी करण्यास सुरवात करण्यात आली. रास्ता रोको केल्याने आगार प्रमुख दिलीप जाधव त्वरेने बस स्थानकावर पोहोचले. त्यांनी पास संपल्याचे मान्य केले. परंतु वाहकांना या संदर्भात सांभाळून घेण्याची सूचना दिली होती. हिसवळ येथे बसच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना ‘कट’ मारून बस पुढे निघून गेली. आज आमची चांचणी परीक्षा होती. काही वेळाने इंधनाची वाहतूक करणारा टॅँंकर आला. त्यात बसून आम्ही नांदगावला आलो अशी माहिती विद्या संजय हिने दिली. काही वेळेस अर्ध्या रस्त्यामध्ये उतरवून देतात. एखाद्यावेळेस तिकीट काढायला लावतात अशाही तक्रारी विद्यार्थिनींनी मांडल्या. सविता शिंदे हिंगणवाडी, जळगावची जगधने, वाखारीची जान्हवी ठोके आदींनी तक्र ारी मांडल्या.