थांब्यासाठी बस रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:59 PM2018-07-18T22:59:03+5:302018-07-18T23:00:32+5:30
उमराणे : येथे महामार्गावरील बसथांब्यावर नाशिकसह सर्व विभागाच्या बसेसला थांबा देण्यात यावा व रामदेवजीबाबा फाटामार्गे जाणाºया बसेस उमराणेमार्गे वळविण्यात याव्यात या मागणीसाठी शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाºयांची धांदल उडाली. यावेळी पुन्हा एकदा आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
उमराणे : येथे महामार्गावरील बसथांब्यावर नाशिकसह सर्व विभागाच्या बसेसला थांबा देण्यात यावा व रामदेवजीबाबा फाटामार्गे जाणाºया बसेस उमराणेमार्गे वळविण्यात याव्यात या मागणीसाठी शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाºयांची धांदल उडाली. यावेळी पुन्हा एकदा आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांच्या नेतृत्वाखाली उमराणे ग्रामस्थांच्या वतीने बस रोको आंदोलन छेडण्यात येणार होते; परंतु नाशिक व मालेगाव विभागाच्या वाहतूक नियंत्रकांनी मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. तरीही बसेस थांबत नसल्याने बुधवारी (दि. १८) शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी अचानक बस रोको आंदोलन केल्याने एकच धांदल उडाली.
१८ ते २० हजार लोकसंख्या असलेले उमराणे गाव हे परिसरातील आठ ते दहा खेड्यांचे दळणवळणाचे केंद्रबिंदू असून, कांद्याची बाजारपेठ, बॅँका, शाळा, महाविद्यालये, ग्रामीण रुग्णालय आदी असल्याने शिवाय गाव राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने येथून उमराणेसह परिसरातील शालेय विद्यार्थी व बहुतांशी नागरिकांना धुळे, मालेगाव, चांदवड, नाशिक आदी ठिकाणी दैनंदिन प्रवास करावा लागतो.
त्यामुळे त्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल होतात. त्यामुळे रामदेवजीबाबामार्गे जाणाºया सर्व बसेस उमराणेमार्गे वळविण्यात याव्यात याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून परिवहन मंडळाकडे लेखी निवेदने देण्यात आली होती. तरीही परिवहन महामंडळाकडून या निवेदनांची दखल घेतली जात नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून उमराणे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळेसही आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनाचीही पूर्ती झाली नाही. त्यामुळे सहनशीलता संपलेल्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी कोणत्याही नेतृत्वाची वाट न पाहता बस रोको आंदोलन छेडत आपला राग व्यक्त केला. इशारा देणाºयांकडूनच समजूतयापूर्वी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी आंदोलनाच्या एक दिवस आधीच आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून नाशिक-इगतपुरी, धुळे-इगतपुरी या गाड्यांना तत्काळ थांबा देण्याचे आणि नांदगाव-सप्तशृंगगड ही गाडी उमराणेमार्गे वळविण्याचे आश्वासन दिले होते. तसेच थांब्यावर पंधरा दिवसांसाठी एका वाहतूक नियंत्रकाचीही नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु आश्वासनानंतरही बस थांबत नसल्याने प्रवाशांचा संतापाचा बांध फुटला. दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच विलास देवरे, पं.स. सदस्य धर्मा देवरे, ग्रा. पं. सदस्य सचिन देवरे यांनी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढत गाड्या थांबविण्याचे आवाहन चालकांना केले.बस रिकाम्या असतानाही थांबा नसल्याकारणास्तव तसेच बहुतांश चालक व वाहकांच्या मनमानी कारभारामुळे परिवहन महामंडळाच्या गाड्या येथे थांबत नाहीत. त्याचप्रमाणे मालेगाव, कळवण, धुळे आगाराच्या बहुतांश बसेस रामदेवजी फाटामार्गे जात असल्याने उमराणे येथील शालेय विद्यार्थ्यांना देवळा, कळवण, मालेगाव येथे जाण्यास वेळेवर बस उपलब्ध होत नाही.