चांदवड, नामपूरला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:22 AM2017-09-15T00:22:52+5:302017-09-15T00:23:00+5:30

कांदा भावात घसरण : शेतकरी संतप्त; लिलाव पाडले बंद नामपूर : बागलाण तालुक्यातील नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदीदार व्यापाºयाच्या साठवलेल्या मालावर अचानक प्राप्तिकर विभागाच्या पथकाने धाडी टाकल्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले असून, शेतकरी व व्यापाºयांनी एकत्र येऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी दोन तास रास्ता रोको केला.

Stop the Chandwad, Nampuralla route | चांदवड, नामपूरला रास्ता रोको

चांदवड, नामपूरला रास्ता रोको

Next

नामपूर येथे रास्ता रोकोनंतर शेतकºयांशी संवाद साधताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक खैरनार.

कांदा भावात घसरण :  शेतकरी संतप्त; लिलाव पाडले बंद

नामपूर : बागलाण तालुक्यातील नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदीदार व्यापाºयाच्या साठवलेल्या मालावर अचानक प्राप्तिकर विभागाच्या पथकाने धाडी टाकल्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले असून, शेतकरी व व्यापाºयांनी एकत्र येऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी दोन तास रास्ता रोको केला.
यंदा मोसम खोºयात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले आहे. गत महिनाभरापासून कांद्याला चांगला भाव मिळत होता; मात्र शहरी भागात ग्राहकाला महागडा कांदा खरेदी करावा लागत असल्यामुळे शेतकºयाकडून कांदा खरेदी करून साठेबाजी करणाºया व्यापाºयाच्या शेडवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाºयांनी अचानक धाडी टाकल्या. यात नामपूर येथील एका व्यापाºयाच्या शेडवर या पथकाने तपासणी करून कार्यवाही केल्यामुळे नामपूरच्या सर्व व्यापाºयांनी कांदा लिलाव बंद पाडले. यात कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे संतप्त झाले. त्यांनी मार्केटच्या गेटसमोर सुमारे दोन तास रास्ता रोको केला. नामपूर बाजार समितीत दुपारी
४ वाजता लिलाव सुरू
करण्यात आले; मात्र बाजारभाव सरासरी एक हजारपर्यंत पुकारण्यात आल्यामुळे कांदा उत्पादक प्रचंड नाराज झाल्याचे चित्र होते. आर्थिक टंचाई, मजूर टंचाई, पावसाचे वातावरणमुळे नामपूर मार्केट येत्या मंगळवारपर्यंत बंद
ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सचिव संतोष गायकवाड यांनी दिली. कांद्यास किमान दोन हजार रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पगार, काँग्रेसचे प्रवीण सावंत, समीर सावंत, मधुकर कापडणीस यांनी करून भाजपा शासनाचा निषेध केला. या रास्ता रोकोप्रसंगी नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण, मंडळ अधिकारी सी.पी. अहिरे, पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी भेट देऊन व्यापारी व शेतकºयांच्या अडचणी समजून घेतल्या.चांदवडला संतप्त शेतकºयांचे ठिय्या आंदोलनचांदवड : शहरातील कांदा व्यापाºयावर आयकर विभागाच्या अधिकाºयांनी छापे टाकल्याच्या निषेधार्थ कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कांदा व्यापाºयांनी कांदा लिलाव बंद ठेवले. सकाळपासून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत २०० ते ३०० टॅक्टर व पिकअपमधून ग्रामीण भागातील शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. सकाळी १० वाजता लिलावास प्रारंभ होईल या अपेक्षेवर शेतकरी लिलाव सुरू होण्याची वाट पाहत होते. बाजार समितीत जाऊन त्यांनी चौकशी केली असता आता लिलाव सुरू होईल. थोड्या वेळ्याने लिलाव सुरू होईल, अशी उत्तरे मिळाल्याने शेतकरी अधिकच संतप्त झाले. लिलाव सुरू होत नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाले.
संतप्त शेतकºयांचा ताफा मुंबई आग्रारोडकडे रास्ता रोको करण्यास निघाला. घटनेचे वृत्त वाºयासारखे समजताच चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी हे पेट्रोलपंप चौफुलीवर आले. त्यांनी संतप्त शेतकºयांना शांत करून आपण लगेच बाजार समितीत जाऊन लिलाव सुरू करण्यास सांगू, असे सांगून सर्वच शेतकºयांना कृषी उत्पन्न बाजार समितीत आणले. संतप्त शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी आम्ही सकाळपासून आलो मात्र आमचे कांदा लिलाव होत नाही, यावर नाराजी व्यक्त करीत बाजार समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर, संचालक विलास ढोमसे, निवृत्ती घुले, संजय जाधव, चंद्रकांत व्यवहारे, पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, युवानेते राहुल कोतवाल, समाधान जामदार यांच्यासमवेत व्यापारी व शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक सभागृहात झाली. यावेळी व्यापाºयांनी आयकर विभागाच्या धाडीबरोबरच आम्हाला अवघा ५०० क्विंटल कांदा स्टॉक करण्याची परवानगी असताना आम्ही कांदा खरेदी करून अजून कुठे अशा धाडींना सामोरे जाऊ याकरिता आम्ही कांदा लिलाव सुरू करणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र डॉ. कुंभार्डे, नितीन अहेर व संचालकांनी विनंती केली.
व्यापाºयांनी आजच्या दिवस तरी शेतकºयांची अडचणी व दूर करून एवढा माल आणल्याने लिलाव करावा असा आग्रह केल्याने त्यांची विनंती मान्य करीत आजचा दिवस लिलाव सुरू केले. मात्र आजचा बाजारभाव ७०० ते ११०० रुपयेपर्यंत राहील व आज व्यापाºयांनी बॅँकेतून पैसे न आणल्याने या मालाचे पैसे २४ तासात देऊ, असे सांगून लिलाव दुपारी ३.३० वाजता सुरू झाले; मात्र उद्यापासून चांदवड बाजार समितीत व्यापाºयांचा बंद असल्याने पुढील निर्णय होईलपर्यंत शेतकºयांनी कांदा आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले.

Web Title: Stop the Chandwad, Nampuralla route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.